सांग तू साथ देशील ना मला
ह्या ओसाडलेल्या माळरानावर
आपल्या प्रेमाची बाग फुलवायची आहे मला
उद्याची हिरवी स्वप्नं साकारताना
तुझ्या हिंमतीची जोड हवी मला
ह्या गवताच्या झोपडीत
मोडका संसार थाटायचा आहे मला
माझ्या खांद्याला खांदा देशील
याची यास आहे मला
निष्पाप मनाच्या घरट्याला, तुझ्या
प्रेमाच्या फांदीचा आधार हवाय मला
थकून आलेल्या जीवाला तुझ्या मायेच्या
सावलीत निवारा हवाय मला
कष्टाच्या चाकोरीतून जाताना
दु:खाचे चटके सोसावे लागणार
आयुष्याचा गाडा ओढताना खाचखळग्यातून
जाव लागणार आहे तुला
मला अभिमान आहे तुझ्या कर्तुत्वाचा
दु:खात असताना हि आनंदी राहायचा, जर
नाहीच पेलवला ह ओझ तरी चालेल मला पण
तुझा सहवास हवाय आयुष्य भरासाठी मला
सांग तू साथ देशील ना मला
- मनोज गोबे