Friday, September 28, 2012

माझ्या प्रेम कहाणीचा सुखद अंत करायला जमलेच नाही .....!!

जमलंच नाही ....!!
तूला  सांगायला
तू  जवळ असताना  जमलंच    नाही
नजरांनि  नजरांशी  बोलायला ...
प्रेमाच्या  सरीत  थोडावेळ भिजायला

जमलंच नाही  तुझ्या  डोळ्यांमध्ये पाहायला 
पाहायचो  चोरून  कधी तू  तर कधी मी
खरच  हिम्मत  झालीच  नाही हात धरण्याचा 
प्रेम खूप  आहे  तुझ्यावर
मला मिठीत घे ना बोलायला

जमलंच नाही  ....!!

आजवर एकांतात जगलो
वाटलं  तुझी  साथ  मिळावी
पण  नेमके तुझे  लग्न ठरले
जमलंच नाही रे शेवट पर्यंत
माझे  हे प्रेम सांगायला...

माझ्या प्रेम कहाणीचा सुखद अंत करायला
जमलेच नाही .....!!  

आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये ?

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
 
कळीचे होते गुलाब ,गुलाब कोणी मागू नये 
ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे कोणी टोचू नये 
असे वाटते आजकाल ,कोणासाठी जगू नये 
 
कल्पनेचा खेळ सारा,काव्य कोणी मागू नये 
गोंदा मनी अक्षरे सारे,कागद कोणी फाडू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
 
जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये 
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
 
मी तिचा ती माझी,तीचासाठी कोणी जगू नये
वेगळे तिचे जग सारे,प्रेमामध्ये कोणी पडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
   
आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 

तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते

एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. 


अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?

प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
 

सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?
ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.तुझा आवाज सुंदर आहे.तू अतिशय काळजी घेणारी आहेस. 
प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.

प्रिये, 
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.पण आता तू बोलू शकतेस का?नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तू अतिशय प्रेमळ आहेस तू विचारी आहेस.तुझे हास्य मोहक आहे. तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो. पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. 
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
 
नाही.
 नक्कीच नाही.

म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.


 
थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.

खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. 
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात,
 पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता. 
आणि शेवटी....ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.  

शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...

पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.

एव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅंटीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात कॅंटीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज "प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण "तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच "प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.

तसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही! एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय! तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. "कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.

पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो "हो' म्हणेल की ..!' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्‍वासक आणि थोडे आश्‍वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्‍याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, ""मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, ""मलाही!'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, ""तुझे माझ्यावर प्रेम आहे?'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन "नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, "तुझे आहे काय?' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला "नाही' म्हणताच आले नाही. त्याने "लिटल बिट' म्हटले.

तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने "हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, ""तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, ""ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी "महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.

प्रेम हे प्रेम असतं...'

रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.

ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''

ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''

ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''

त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.

गुलाबी थंडीला प्रीतीची झालर!

पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.

म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.

त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्‍स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्‍या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्‍लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''

तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''

बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.

दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्‍वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''

तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...

चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.


"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्‍चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती.

मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण

अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे " 
 विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
 

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत"  So I am  sorry Vishal ........!!
  (10 दिवसांनतर) 

राहुल :- "अंजली एक  आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
  तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक  पत्र दिले, 
त्या पत्रात लिहिले होते की,

 "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम  मिळत राहील"

 
I love you and now have a long love life ahead.
 फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल 
:(

प्रेम करायचंच / नाही

असं म्हणतात कि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. पण तसं अजिबात नसत, मुळात प्रेम कधी खरं किवा खोटं नसतं. प्रेम हे नेहमीच खरं असतं मग ते पहिलं असो वा दुसरं. प्रेमात पडायला  मर्यादा नसतात. काही वेळा असं होतं कि आपण चूकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो कालांतराने लक्षात येतं कि समोरची व्यक्ती आपल्या अजिबात योग्यतेची नाही. पण डोक्यात काही चुकीच्या कल्पना रुजलेल्या असतात... पहिलं प्रेम, प्रेम फक्त एकदाच होत वगैरे वगैरे. मग या दडपणाखाली नको असलेल्या नात्याचा एकतर स्वीकार केला जातो ज्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात  किव्वा प्रेमभंगाच्या धक्क्याने काहीजण आत्मघात करायलाही पुढे मागे पहात नाहीत.
 
जर पहिले प्रेम यशस्वी नाही झाले तर पुन्हा प्रेम करायचंच नाही असं म्हणण चूकीचं आहे. चूका प्रत्तेक गोष्टीत होतात भाजी घेताना नाही का एखादा टोम्याटो बाहेरून खूप छान रसरशीत दिसतो पण आतून किडलेला असतो. तेव्हा आपण ती भाजी खाणं सोडून देतो का? जोडीदार निवडतानाहि चूक होऊ शकते. आयुष्य कधीही कोणासाठी थांबत नसतं. मग स्वताचा अमूल्य वेळ अयोग्य व्यक्तीच्या विचारात का घालवा? जे प्रेम यातना देतं ते मूळी प्रेम नसतच. त्यासाठी स्वताच नुकसान करून घेण हा निव्वळ मूर्खपणा आहे. जर पहिलं प्रेम तुम्हाला यातना देवून गेलय तर नक्कीच विचार करा दुसऱ्या प्रेमाचा पण डोळसपणे.

नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता

 १४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे  .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही.

 हा फक्त माझ्या मनात असलेली  प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.

    
            आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची  जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच  वर्गात शिकताना 

२) एकाच  ऑफिसमध्ये     

३) एकाच ठिकाणी राहत असलेली ४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट

  
             आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो.  


        आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते. 
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते. स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी. पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन. 
        महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे.

मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का

 
      बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का.

 किती प्रेमीवीर जोडप्यांचे  लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .

      
             प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस ,  म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते. 
        बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात.   

माणसाची Life

माणसाची Life आहे खूप Vast
जमली तर "खास" नाहीतर "वाट"

कधी असते Tragedy
कधी Comedy
तर कधी Melody
असाव लागत प्रत्येक क्षणासाठी Ready

आयुष्यात कराव लागत सुखदुख: Carry
रहा फक्त Steady
सांगण एकाच "Dont Worry"

ध्यानात ठेव तुझा Goal
With Full Of Your Heart & Soul..,
तेव्हाच कळेल तुला जीवनाचं "मोल"

एक कहाणी ....सुखः दुखः ने विणलेली

सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.
कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.
सुखः हसण्याच्या रुपात तर दुखः अश्रूंच्या रुपात वाहते.
पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्पुरण असते.
दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते.
आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.
आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.
कारण छान जगण्या  इतपत तरी आपण  शिकलेलो असतो.

Friday, August 24, 2012

"जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिले प्रेम केले असेल तर हि प्रेम कथा नक्की वाचा "

"जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिले प्रेम केले असेल तर हि प्रेम कथा नक्की वाचा "


१० वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. ११ वी - १२ वी पण छोट्या कॉलेज ला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे कसे वागायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता. १२ वी नंतर मोठ्या कॉलेज ला गेलो.
आणि Fy च्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती.

...
तिच अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं.
पण आम्ही इतके धीट कुठे? मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकट्यानं लेक्चर जाऊन बसलो.
तिच्याशी बोलण्याचा योग आला तो Fy च्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले
"हाय, कसे गेले पेपर? मला electronics चे दोन्ही पेपर फार अवघड गेले. "..
"गेले गठठ्यातून, आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते.. बाकी? सुट्टीत काय करणार? ".. ती बोलली.
"काही ठरवलं तर नाहीये, बघू.. "..
"ओके, बाय, मला जायचंय.. "
"बाय.. " मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले. ... आणि स्कूटी वरून ती निघून गेली.
दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता. त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. आक्खी सुट्टी निघून गेली... आणि परत एकदा कॉलेज चा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खूश होतो.
ती कुठे दिसतिये का बघायला मी गेट वरच थांबलो. ती आली, गाडी पार्किंग मध्ये नेताना तिनी मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली.
'ती आपल्याकडे बघून हसली? ', मी ह्या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्या जवळ येऊन थांबली.
"काय म्हणताय साहेब? इथे का थांबलाय? " ह्या वेळेस तिनी सुरुवात केली.
मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. "काही नाही, सहजच कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो.. चल जयाचं वर्गात? "
"हो चल, उशीर झाला आहे, लेक्चर चालू झाला असेल. "
आणि अशाप्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिच बोलणे तासंतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले, तसे आमच्या मध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिंधास्तपणे बोलू लागलो.
मला बुद्धिबळात आवड. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कल च्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो.
साधारण आठवडा गेला असेल, तिनी मला विचारलं, "चल, मी पण येते बुद्धी लावायला"
"अरे वा!, चल की" मी एकदम आनंदानं उत्तर दिले. आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चर ला न बसता थेट आर्ट सर्कल च्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्या झाली.
तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हत, तरी ति यायची. कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावी अस मला वाटू लागले. मग ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्या मधील नात हे मैत्री पुरते उरले नाहीये ह्याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती.
माझयासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होत, पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारायचं ठरविलं. त्या दिवशी ती आली, थोड्याफार गप्पा झाल्या.
"काय रे? आज इतका गप्प गप्प का? काही होतंय का तुला? "..
"नाही गं, असच, मला काहीतरी बोलायचं होत तुझ्याशी";
"अरे मग बोल की"..
"असू दे गं, परत कधीतरी बोलीन.. "
माझ्या मनात काय चालू आहे हे तिनी बरोब्बर ओळखलं, तिला पण हे हवंच होत की..
"चल आपण स्कूटी वर फिरायला जाऊयात".. ती बोलली. मी मुकट्यानं तिच्या मागे बसलो. तिनी गाडी पाषाण च्या त्या मस्त एरियात नेली.
"हा, तू काहीतरी बोलणार होतास.. "
तिनी दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो
"मला तू खूप आवडतेस!! "..
"क क क्क क क काय? ".. तिच्याकडून हे उत्तर आलं.
"मला जे बोलायचं होत, ते मी बोललो, आकाशवाणी एकदाच होते, चल आता मला परत सोड कॉलेज जवळ.. " मी प्रचंड हिंमत दाखवून घाई घाई मध्ये बोललो.
तिनी गाडी बाजूला घेतली, आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हटली,
"तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ".. .
मी हळू हळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली.
"हा आता परत बोल मगाशी काय बोललास".. ती म्हणाली;
"मला तू खूप आवडतेस गं, तुझी खूप आठवण येते, तुझ्याशी बोललो नाही ना, तर करमत नाही बघ, फार विचित्र वाटत.. " तिच्या नजरेला टाळून मी एवढे बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला अस मला वाटू लागलं.
"ए वेड्या, हे बघ,..... वरती बघ माझ्याकडे".. मग मी नजर हळू हळू तिच्या डोळ्याकडे नेली.
"मला पण खूप आवडतोस, मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे. ".. हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडेच गेली होती.
तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला, तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली. पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं.
गाडी परत फिरली, कॉलेज च्या गेट जवळ पोचेपर्यंतची ती ६-७ मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतः वरच मी प्रचंड खूश झालो होतो. ह्या गोष्टीला propose टाकणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हत.
तिनी मला कॉलेज च्या दारात सोडले, आता मात्र आम्ही दोघही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो.
तोंडातून एकही शब्द न कढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता..
मग कॉलेज २ ला संपले की घरी न जाता तिथेच ५ पर्यंत गप्प मारत बसायच्या, ५ ला गणिताच्या क्लास ला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचे, एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती. क्लास मधून घरी जाताना "घरी पोचलीस की घरच्या फोन वर मिस कॉल दे" अस सांगणं, बाहेर खणे पिणे, खास करून विद्यापीठातल्या त्या क्लोज कॅन्टिन ला जाऊन गप्पा मारणे अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू झाल्या.
एक दिवस मी सहजच विचारलं, "काय मग ? मी पहिलाच ना?"..
तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता; ती गोंधळली ...
बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना .. आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली.
बराच वेळ झाला शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचलले ..
"अग बोल ना , काय झालं? कोणी असेल तर सांग.. प्लीज लपवू नकोस " ..
आता मात्र ती खूपंच गंभीर झाली. आणि तिचे डोळे पाणावले.
"मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं, मला एक जण आवडायचा या आधी, पण प्लीज, आता तसं काही नाहीये, आणि ह्या गोष्टीला आता बरेच दिवस झाले... मी ते विसरलिये.. ....
भयाण शंतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती.
वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे .. मला तू खूप आवडतोस रे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. "...
मला काय बोलावे ते कळेना.. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनी उत्तर दिल, जणू काही मी तिला हे प्रश्न विचारीन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानांमधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता.
तो ८ महिने बाहेर आणि ४ महिने पुण्यात असतो, भरपूर पगार ...आणि अस बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळाल.
माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली , मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही नव्हता केला. मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तिथून निघून गेलो.
२-३ दिवस गेले,मी काहीच संपर्क केला नाही, तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता
"हे बघ वेड्या, तुला ती खरंच मनापासून आवडते ?" तो मला धीर देत बोलला.
"हो रे? हे काय विचारणं झालं का? "
"तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ? "
"हो आहे रे .. पण ... "
"पण वगैरे काही नाही, आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. "
तिला मी कॉलेज मध्ये गाठलं. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्याप्रकारे बोलेल त्या पद्धतीनं मी तिला म्हणालो,
"हाय, काय चाल्लय ? "..
"काही नाही विशेष.. " तिनी पण तसंच उत्तर दिले.
कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो, पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या.
"आज फार बोर होतंय नाही".मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो.
"हो ना, खरंच आज फारच बोर होतंय, क्लास ला पण वेळ आहे अजून बराच; चल आपण कुठेतरी जाऊयात. "..
"कुठे जायचं ? मला फार काही माहीत नाही ह्या एरिअयात मधलं, प्लीज विद्यापीठ नको , तिथे जाऊन जाऊन मला कंटाळा आलाय".. मी पण माझं मत मांडलं.
"वेड्या, माझ्या घरी येतोस ? इथे जवळच आहे.. " चल जाऊ.. बस मागे.
माझ्या उत्तराची वाट न बघताच तिनी गाडी सुरू केली , मी मख्खासारखा मागे बसलो. आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत, ह्याची मी तयारी सुरू केली.
आम्ही घरी पोचलो. घरी कोणीच नव्हत. मी एक सुस्कारा सोडला. तिनी मस्त चहा आणि मॅगी करून आणले . आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो. आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती.
मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली, मॅगी ची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली.
तिला पण खूप आनंद झाला.
झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली.
..
कधी कधी तिच्या घरी जाण , मग तिनी मस्तपैकी चहा - आणि मॅगी बनवणे, तिच्या कुशीत पडून मस्त गप्प मारण, भविष्याची स्वप्ने रंगवणे अश्या गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होत . प्रेम खरंच इतकं सुंदर असत ह्याची जाणीव झाली...
काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होत.

त्यादिवशी त्यांच्या घरी असताना, अचानक फोन वाजला. तिनी उचलला. आणि ती खूप खिन्न झाली. फक्त "ठीके, येते लगेच " अस ती फोनवर बोलली. तिनी पटापट आवरायला घेतलं, आणि आवरता आवरताच ती मला बोलली..
"चल वेड्या, मला जायला लागेल , "
फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकले नाही,
"अग, काय झालं? अस अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता?"
"तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? " तिनी उलट प्रश्न केला..
"हो , मला सांगायलाच पाहिजे .. " मला ते न जाणून कशी चैन पडली असती ?
"तो पुण्यात आलाय, त्यानं मला त्याच्या घरी बोलवलाय, काहीतरी काम आहे म्हणे"..
माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरीपण मी स्वतः ला सावरत मन खंबिर केल, माझ्या भावना चेहर् यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला.
"ठीके, जा.. " तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता.
का कुणास ठवूक , पण आमच्या नात्याचे अस्तित्त्व आता फार काळ टिकणार नाही, अस मला उगाचच वाटले.

त्यादिवसपासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही, तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची.
माझं मन ह्या प्रकारानं फार चिरडून निघत होत.
त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती, रडून रडून डोळे सुजले होते, ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिनी मला थांबवलं, गप्प मारत मारत आम्ही पूना हॉस्पिटल च्या पुलावर जाऊन उभे राहिलो.
"वेड्या, मला तुला काहीतरी सांगाचय रे "..
"ह्म्म .. मला कल्पना आलिये, बोलून टाक.." मी अतिशय घट्ट मनानं तिला बोललो. तिला असे दाखवायचा प्रयत्न केला, की ती मला काहीपण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन.
"मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत.. एम सॉरी.. प्लीज मला माफ कर.. प्लीज .. "...
मझी स्वतःवरच खुप चिडचिड झाली. काहीही न बोलता मी उलटा फिरलो, माझ्या हताश, हरलेल्या मनाला सावरत घरी पोचलो. वरच्या खोलीचे दार लावून ओक्साबोक्शी रडत बसलो. ' तिनी जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हत ' अस म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं, पाकिटामधून तिचा फोटो काढला, कसलाही विचार न करता मी तो फोटोचे असंख्य तुकडे केले...
आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून मझ्या डोळ्यान्समोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो...
.
.
असेच दिवस जात राहिले.
परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं.
अजून पण अधून मधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोच.
नंतर अनेक मुली भेटल्या, पण मनापासून कोणी आवडली नाही. मी पण शोधायचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितिवरच हसू येत. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते पण ती होती, आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, पण प्रेम करायला "ती" नाहिये.

काही लोक म्हणतात "पाहिलं प्रेम तेच खरं प्रेम, बाकी सगळी मजबूरी ".. सद्ध्या तरी हेच बरोबर वाटत.....!!!!

Thursday, August 23, 2012

Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही
 download होत नाही
संवेदनांना
 'virus' लागलाय
दु
:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत

delete 
झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं

range 
नसलेया mobile सारखे

hang 
झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही
 website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच
 'cute'
contact list 
वाढत गेली
संवाद झाले
 mute

computer 
च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन
 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय


floppy Disk Drive 
मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा

internet 
वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook
................