बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून..
नाहीतर तुला दिसले असते ओले डोळे दुरून..
बरं झालं जमलं नाही नजरेला नजर भिडवून पाहाणं..
कदाचित मलाच जमलं नसतं भानावरती राहाणं..
तुला उगाचंच वाटलं असतं मी दुबळा आहे..
मीही चारचौघांसारखाच गं , कुठे वेगळा आहे ?
तुझंही नव्हतं पूर्वीसारखं खळीदार मधाळ हसणं..
मध उरला नाहीच आता नुसतंच मधमाशांचं डसणं…
तसाही येणार नव्हताच कधी हातात हात तुझा…
जमिनीवरच्या दगडांवर मेहेरबान होतात का आकाशातल्या वीजा ?
पण तरीही बरं झालं एकदा भेटलीस , मनावरचं ओझं हलकं झालं .
आयुष्य माझ्याशी पुन्हा एकदा बोलकं झालं .
माझं मलाच कळून चुकलं आता चालणं एकाकी आहे…
अर्धं आयुष्य वणव्यात गेलं , पण अजुन जळणं बाकी आहे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...