नकळत सारे तुझे शहारे,
का वेड लावती या जिवाला,
तुझे नजारे तुझे इशारे,
आठवणीतून रोज छळती रे मला..
तु दिसतेस दाहीदिशांना,
तेव्हा वाट मी चुकतो,
शोधता आधार आशेचा,
तेव्हा मला किनारा तुझाच दिसतो..
कधी वाटते या मनाला,
हळुवार कुरवळावे तुझ्या स्मीतफुलांना,
पण ओंजळीत येताच का येते
जाग माझ्या रातींच्या त्या स्वप्नांना...
असेच माझे दिस अन रातीचे,
अजब खेळ सुरू झाले,
तुला पाहता.. तुला आठवता
माझे तुझ्यावर प्रेम जडले...
काही सुचत नाही, कळत नाही,
अबोल्याला आता सांगावे तरी कसे,
या प्रेमाचे या प्रितीचे रंगचित्र,
तुझ्या ह्रिदयी उमटावे तरी कसे...
या कळत नकळतच्या खेळाला,
तुझा सहभाग मला मिळावा,
हा डाव जिवनाच्या सरीपाटाचा
तुझ्या होकाराने तु आता जिंकावा...
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...