- कुठलाही व्यवसाय यशस्वी करणासाठी त्यातील शिक्षणाला महत्व आहे व हे शिक्षण शेवट पर्यंत चालू ठेवावे लागते , मला धंद्यातील सर्व मर्म समजले असा ज्याचा विचार असतो तो बनचुका होतो, व सुधारणा न केलाने अपयशी ठरतो.
- व्यवसाय बंद पडेल अशी व्यर्थ चिंता करणारा अयशस्वी होतो असा चिंतेचे काहीच कारण नसते.
- संकटच्या वेळी उपयोगी पडावे म्हणून उदोजाकानी नेहमी राखीव शक्ती व भांडवल राखून ठेवावे लागते. यालाच गंगाजळी reserve force म्हणतात. युद्धात हि राखीव फौजाचे महत्त्व आहे तेच व्यवसायात आहे. राखीव फौज संकटाच्या वेळी उपयोगी पडते, राखीव पुंजी नसल्यामुळे उदोजक अपयशी ठरतो.
- काहींच्या मनात स्वत: च्या ताकदीविषयी न्यूनगंड असतो व बळकट इच्छा नसते इच्छाशक्तीच्या अभावामुळे अपयश येते.
- निर्णयाश्क्तीचा अभाव हे अपयशाचे कारण आहे.
- व्यवसाय करताना माणसाने भावना प्रधान होता कामा नये , भावनेच्या आहारी जाऊन अयोग्य मित्राला आर्थिक साह्य दिल्यास ते तो बुडवतो . व हि गोष्ट अपयशाला कारणीभूत होते.
- तुमचा वेळ घेणाऱ्या , तुमची मदत व्याया घालवणाऱ्या लोकांना नाही म्हणून सांगण्याची कला जो उदोजक जोपासत नाही त्याला अपयश येते.
- अनेक उदोजाकाना स्वतचे कार्यक्षेत्र निशिच्त ठरवता येत नाही. केवळ जवळ भांडवल आहे म्हणून एकाच वेळी पाच पंधरा क्षेत्रात तो काम सुरु करतो, मग कोठेच यश येत नाही.
- यश जवळ आल्यावरही काही जन अपयशी ठरतात, कारण त्याच वेळी त्यांचा संयम सुटतो, भातशिजे पर्यंत थांबल्या नन्तर तो निवे पर्यंत थांबेवेच लागते.
- व्यवसाय संबंधी किंवा माणसासंबंधी तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत, नाही तर पुर्वग्राहाच्या भोवऱ्यात अडकून उदोजक अयशस्वी ठरतो.
- काही उदोजाकाना थोडेशे यश मिळाल्या बरोबर त्या यशाचा कैफ चढतो, तो अहंकारी होतो व चुका करू लागतो म्हणून यश डोक्यात यश चढू देवू नका .
- व्यवसायातील जाणकारांच्या सल्ला न घेणारही किरकोळ गोष्टी मुले अपयशी ठरतो. कारण सर्व प्रकारची बुध्दिमत्ता तुमच्या कडे असेलच असे नाही.
- उदोजकाची व व्यापाराची एक प्रतिमा असते हि प्रतिमा कायम ठेवानासाठी काही वेळेला किरकोळ गोष्टीकडे हि लक्ष द्यावे लागते असे लक्ष दिले नाही तर प्रतिमा बिगाडते व त्यातून अपयश येते.
- हातातील काम अपुरे ठेवूनच काही उदोजक नवीन उत्पादन/ काम हातात घेतात , त्यामुळेच सर्व कामे अपुरे राहतात व यश लाभत नाही .
- चैतन्याचा अभाव व आळशीपणा हे अपयशाचे मोठे कारण आहे.
- व्यवसायातील प्रतिमा राखण्यासाठी व पद टिकवण्यासाठी स्वतचा स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. प्रत्येक बाबतीत लोभीपणा केलास यश मिळत नाही .
मराठी लेख, कविता, उत्तम विचार, इंग्लिश, हिंदी.खूप सारे वाचण्यायोग:- हा ब्लोग फक्त विचारांचा टेवा आहे, कवितांच्या संग्रह आहे , गोष्टींच्या संग्रह आहे....याचा माझ्या व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंद नाही, कृपा करून याची नोंद घ्यावी ....अजून गोष्ट" " All Material Appearing in this blog are fictitious. any resemblance to real persons, living or dead is purely coincidental " :- Manoj Gobe
Monday, December 13, 2010
अपयशाची सोळा कारणे:
अपयशाची सोळा कारणे:
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...