Friday, October 12, 2012

मनामध्ये मन माझे आताच दाटले ...

रंग होळीचे हे कधी रंगलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही...

आसवांचे झरे हे असे वाहत गेले की
अश्रुथेंब कधी हे अटलेच नाही...

वाटेवर या अशा बिकट चालतो मी एकटा
माझ्यासाठी मन तुझे गोठलेच नाही...

मनामध्ये मन माझे आताच दाटले 
पावसासंगे संगे अश्रु कधी टाळलेच नाही...

तिचे माझे रस्ते हे असे दुभंगत गेले की-
हातांना या हात कधी मिळ्लेच नाही...

पाने गळून गेली सारी पानझडीचा वृक्ष झालो 
हर्ष होऊन पाने कधी सळसळलीच नाही...

दु:ख माझे तू तर कधी गिळलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही......

माणूस राहिलो नाही... कारण माणुसकिच विकलो मी......


पैशाच्‍या बाजारात
विकलो गेलो मी
भावशुन्‍य झालो
कारण हृदय विकले मी
विचारशून्‍य झालो
कारण मनही विकले मी
माझी बेईज्‍जती कोण करणार
इज्‍जरती विकली मी
मानहानी कोण करणार ?
मानच कापून दिली मी
माणूस राहिलो नाही...
माणूस राहिलो नाही...
कारण माणुसकिच विकलो मी......

यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !


टुकडों में जी जाती है, जिंदगी कैसे,
ज़ख्मों की की जाती है, गिनती कैसे!

मेरा हर झूठ, बन जाता है सच,
इस सच पे लिखूं, शायरी कैसे!

हर तरफ़ अपनों की लगी है भीड़,
इस शोर को कहूँ, तन्हाई कैसे!

अन्दर कुछ, बाहर कुछ और हूँ मैं,
आईने में देखूं अपनी सच्चाई कैसे!

कहते हैं फकीरी में ताक़त गजब है,
कायस्थ तेरे भीतर चलाऊं सुई कैसे!


कैसे दिल को समजवो कैसे !
जो ये दुंद रहा है , उसे राह  दिखाऊ कैसे ?


मेरे पास वक्त बहुत कम है,
एक तेरी ही आँख नम है। 


इश्क को करने दो इन्तजार,
कामयाबी बस चार कदम है। 


चुभे है इतने नश्तर सीनों में,

मुहब्बत ही आज का धरम है। 

मैं निकला हूँ जीतने दुनिया,
दिल में प्यार, हाथ में कलम है। 


एक तेरी बाहें मुझे है नामंजूर,

ये दिल नादान , इसको दुनियादारी सिखायो कैसे !
यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !




Monday, October 8, 2012

आपण कुणालातरी आवडणं...

खरच ! किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,...
कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच
पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,

देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

--------------------------------------------------

फक्त एकदा सांग तुला,माझी आठवण येते का?

एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?
नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?
मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?

एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस का?

जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?

अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस का?

चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?

कोणी नाही जाणून सुधा मागे वळूनपाहतेस का?

सवांद प्रेमाचा कि मस्करीचा : Everything Fair Love and War

रिया कॉलेजला जात असताना तिला कोणाचीतरी हाकऐकु येते,ती जागीच थांबली.एक मुलगा धापा टाकत तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव शिरीष,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तुला love at first sight वर विश्वास आहे?...काय? (रिय ा खुपच दचकलेल्या आवाजात ओ
रडते). ओरडु नको, मला lovd at first sight ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी.
रियाःमग मी काय करु? तोःfrndhp
रियाःआणि नाही केली तर.,
शिरीषःतु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांना मुकशील।
रियाःअसं!ठीक आहे मी करीन तुझ्याशी मैत्री,बघुया तु काय करतोयस ते!पण मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाहीतर?
शिरीषःफक्त सातच दिवसात तुला माझ्यावर प्रेम होईल।
रियाःइतका over confidance,पडशी लतोँडावर
शिरीषःबघ पैज लावुन सांगतोय,फक्तदिव सातला एक तासभर माझ्याबरोबर spend करायचा.तुला आठवडाभरातच माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल.
रियाः interestin g मान्य एकदम मान्य. ठीकेय ur time will start fromtomarrow..b y
पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक गुलाब घेऊन आला होता.ते तिला आवडलं.तिला ताज होटेल दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास कसा निघुन गेला कळतंच नाही.अशा तर्हेने तो रोज मुंबईतल्या वेगवेगळ्या ठीकाणी तिला फिरवायला नेऊ लागला, बघितलेलेच स्पॉट / ठीकाणे त्याच्यासोबत बघण्यातलं वेगळेपणतिला स्पष्ट जाणवु लागलं. त्याच्यातला बोलकेपणा,त्याची सहजवृत्ती,त्याच ्या स्वभावातला गोडवा तिला आवडु लागला.त्याच्यास ोबत असलं की ती सगळं विसरुन जायची.ती फक्त आणि फक्त आनंदी दिसायची.वेगवेगळ ी ठीकाणे पाहण्यात सहा दिवसकसे गेले तिला कळलंच नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेम झालं होतं.तिलात्याची सवयच लागली होती.तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार नाही हिची तिला हुरहुर लागुन राहीली होती.तो फक्त माझा व्हावा असं तिला वाटु लागतं.त्याच्याव िषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण त्या पैजेचा विचार करुन ती स्वतःला आवर घालायची.आज सातवा दिवस तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन गेला.आणि त्याने तिला डोळे झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात आपल्या हातात घेऊन त्या घड्याळातबघतो.बर ोबर 6.15 वाजल्यावर तिला डोळे उघडायलासांगतो.त िने डोळे उघडताच,मावळतिकड े झुकलेल्या सुर्याची एका आकारात पडलेली किरणे आणि त्याचे पाण्यात पडलेलेप्रतिबिँब पाहुन तिचं मन प्रफुल्लित झालं.तो देखावा तिने तिच्या डोळ्यात भरुन घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार मानते.शिरीष दुःखीमनाने म्हणतो,आज सातवा म्हणजे शेवटचा दिवस,मला माफ कर,मला खरंच तु आवडतेस.मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं होतं.म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ मागुन घेतला.आणिया सात दिवसात पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण मी याबद्दल confident नव्हतोकी तुलामाझ्या प्रेमात पाडु शकेन की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i m sorry असं म्हणुन तो निघुन जातो.तीत्याच्या कडे बघतच राहीली.
रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने ठरवलेलं असतं की,आजचा दिवस संपल्यावरच म्हणजे बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u म्हणायचं.हातातल ्या घड्याळाकडे ती उशीरपासुन बघत असते..बरोब र12.0 5 झाल्यावर ती त्याला फोन लावते.शिरीष आत्ता तु पैज हारलास.कारण सात दिवस आत्ता पुर्ण झालेत.खरंचमी या दिवसांत तुझ्या प्रेमात पडले पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धा तुझीहार मान्य कर.
शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरी love u म्हण
रियाःआता ठीक आहे,आत्ता बोलायला काहीच हरकत नाही.I LOVE U SHIRISH, IREALLY LOVE YOU SO MUCH..
शिरीषःreally u love mi?
रियाःyah
शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु तुझ्या bedroom मधुन hallमध्ये जा.
रियाःok गेले....पुढे काय?
शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत बघ?
रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.
शिरीषःआपण जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे मी तुला डोळे झाकायला सांगुन तुझा हात हाती घेतला होता ना,तेव्हाच मी तुझं घड्याळ पंधरा मिनिटे पुढे केलं होतं.कारण अशी परिस्थीती येणार हे मला माहीती होतं.आता बोल झालं ना बरोबर,सात दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?
रियाःsmart...vr y smart उद्या भेट तुला सांगते.
शिरीषःsorry bt everything fair in love & war......

I LOVE U: दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की











अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत.
अंकीताला वाचनाची आवड आहे
तर शुभमला मोबाईल चॅटची..
वाचचाना तिचं थोडं

लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुनबसलाय.
अंकीता त्याला सहजच म्हणते,i love u.हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.
आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन
देतेस..
अंकीता याची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाचीजाणीव झाली पाहीजे.
आणि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशीबोलु लागतोस.
जे मला हवं असतं.
आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु
आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपणवेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक
किती वेळा वाचशील?
अंकिता हे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमःछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीता i know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..
तोच इथेसुरु होतोय.चला तर मग तोच
अनुभवुया.
काही दिवसांनंतर रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज
कॉलेजवर आलीच नाही..
गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.
शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँतकु ठेही पहीला मला सांगुन जाणारीअंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.
या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज
सोडला नाही.
थोडा विचार केल्यावर त्याला एक
गोष्ट आठवते.
तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन
गेलीय.
त्याला ती वाचत असलेल्या रोमियोज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.
तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने
म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यातआपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हातेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने
फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.
त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते
पाहायचंय.
जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित
मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन
आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतंत्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.
आज तातडीने यायला सांगितलंय.
मला माझं नशीब
आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबातआहे....तु झी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्ट ेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं.शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाटवेगाने रेल्वेस्टेशनकडे
निघाला.
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला.चौकशीअंती कळालं
की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय.
तो खुपच निराश
झाला.त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं.
तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एकाबँचवर बसुन राहीला.
तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले.तर ती अंकीताची एक मैत्रीण होती.ती म्हणाली अंकितातुझ्यासाठ ी काहीतरी देउन गेलीय.
तो म्हणाला,काय?
ते तु अंकीतालाच विचार..
ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे
हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतलाहोता.शुभमल ा सोडुन न जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,अंकीता नाही...
मित्रांनो आज वरघडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो
मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.
आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो.
frnds
मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही.मला फक्त एवढंच सांगायचंय.
"दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की "

Friday, October 5, 2012

ती वेळच होती वेडी...ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी

ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते


कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते

संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते


ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह


भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह


डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले


अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही


त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही


ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली


ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ..

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...

Wednesday, October 3, 2012

LOVE STORY:- तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...


आदि आणि शैलजा हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आदि हा शैलजावर खुप प्रेम करतो, हे शैलजाला माहीती आहे पण, शैलजाला आदिच्या मैत्रीमध्येसुद् धा काही interest नाहीये. पण एक दिवस आदिच्या या मैत्रीचा शेवट करण्यासाठी ती त्याला म्हणते, i m sorry aadi, मी तुझ्याशी मैत्री ठेवु शकणार नाही, cause u r so boaring person. मला तुझ्यासोबत खुपच बोअर होतं...

असं म्हणु नको शैलजा मला तुझी मैत्री हवीय,त

ी मी कशीतोडु. कसं सिद्ध करु की मी इतकाही बोअर नाहीये. ठीकेय एक संधी देते तुला, तु मला पुढची दहा मिनिटे तुझ्यासोबत कशाही प्रकारे रमवु शकलास तर मी मैत्री नाही तोडणार. तिची ही अट तो स्वीकारतो, आणि म्हणतो, ठीकेय मी तुला एक lovestory सांगतोः
विशाल नावाचा एक मुलगा होता. आजपर्यँत त्याने किती प्रेमप्रकरणे केलीत, त्याचेकिती breakups झाले हे त्याचं त्यालाच ठावुक नव्हतं. एक दिवस, तो सध्या ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा, तिला विशालच्या या स्वभावाची जेव्हा माहीती झाली. तेव्हा ती फारचदुःखी झाली. आणि तिने विशालशी breakup केला. प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने breakup केला होता. याआधी तर विशालच मुलींबरोबर breakup करायचा. तो न राहवुन आतुन खुपच हादरला गेला होता. कितीतरी मुलीँचे हार्ट आपण तोडलेत पण एखाद्या मुलीने आपलं हार्ट तोडल्यावर जे feel झालं ती feeling त्याच्यासाठी खुपच नवी होती. विशालला जाणीव झाली कि आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे केलं तेफारच चुकीचं होतं. पण आता माझं खरंप्रेम आहे आशा. आशाला मी हातची जाउदेणार नाही.
तो पुन्हा आशाच्या मागेमागे जाऊ लागतो, तिला सॉरी म्हणत असतो. पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो, त्यामुळे ती त्यालाभाव देत नाही. पण एक दिवस विशाल आशाला आडवुन विचारतो, आशा काय चाललंय तुझं? मी कितीदिवस झालं तुझ्याकडुन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागतोय, पणतु देत नाहीस. अगं तुच माझं खरं प्रेमआहेस, तुच माझं नशिब आहेस...बाकी कोणी नाही.
आशाः मीच तुझं नशीब आहे ना, ठीकेय देते तुला एक संधी, आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे, एक गार्डन, दोनकॉफीब ार आणि तीन समुद्रकिनारा यापैकी एका ठीकाणी मी आज संध्याकाळी सहा वाजता तुझी वाट पहात असेन. जर तुझ्या नशीबात मी असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तु मला भेटशील. by
असं म्हणुन आशा तिथुन निघुन जाते.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात.तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो.आण डोळे झाकुन एक ठीकाण निवडतो. जे त्याच्या मनाला भावणारं असतं.तो वेळेत घरातुन बाहेर पडतो।सहा वाजता आशा"समुद्रकिनार ी"त ्याची वाट पहात असते.भरधाव वेगानेतो गाडी मारत असतो.पण पुढे एका ठीकाणी ट्रॅफीक जाम झालेलं असतं.तो तिथेच गाडी लावुन धावत धावत जाऊ लागतो.शेवटी ठरवल्याप्रमाणे तो समुद्रकिनारीपोह ोचतो.पण ती तिथे नसते.कारण तो पोहोचेपर्यँत सात वाजलेले असतात.आणि ती निघुन गेलेली असते.पण विशालला वाटतं कि,कदाचित ती माझ्या नशिबातनाहीये.ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठीकाणावर माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिची वाट पाहतोय.थोड्यावेळानंतर तो दुःखी मनाने नशीबालादोष देत निघुन जातो. चार वर्षानंतर......
आज विशालचं लग्न आहे.त्यालाचांगली नोकरी ,चांगला पगार आहे.तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानेसिद्ध केलंय,कारण आईवडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशीच तो लग्न करतोय, आणि ते ही त्या मुलीला एकदाही न पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंचदुर्मिळ बाब आहे. काही वेळानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात.नवरा बायकोँसमोरचा आंतरपाट काढला जातो.तर काय आश्चर्य! ते दोघे दुसरेतिसरे कोणी नसुन, आशा आणि विशालच असतात. एकमेकांना चार वर्षांनी, आणि तेही अशा रुपात बघुन त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात.....पण स्वतःला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात.आणि पुन्हा एकदा नशीबाने घडवलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खुप खुप आभार मानतात...
.
आदिने सांगितलेल्या या lovestory मुळे शैलजा पुरती मोहुन जाते.तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात.थोडावेळ ती स्वतःला या कथेमध्ये पुर्णतः विसरुन गेलेली असते.ती डोळेपुसत म्हणते,खरंच आदि एका वेगळ्या जगात तु मला नेलं होतंस,मी खरंच खुप भावुक झाले.मला त्यां विशाल आणि आशाला भेटायचंय,कुठे मिळतील ते?कधी नेशील मला....आदिःते तुला माझ्या घरी मिळतील.कारण मी त्यांचाएकुलता एक मुलगा आहे,ते माझेच आई वडील आहेत.
हे ऐकुन शैलजाला काय बोलावेकाही कळतंच नव्हतं.मन अगदी सुन्न झालं होतं,ती म्हणते,खरंच तु खुप lucky आहेस.या गोष्टीनंतर तर तुझ्याबद्दल माझं मत पुर्णपणे बदललंय.तुझे ते आईवडील मला त्यांची सुन म्हणुन स्वीकारतील?काय तु मला तुझी solemate म्हणुन accept करशील? पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी,
तो होकारार्थी मान हालवित तिला आपल्या मिठीत घेतो.आणि थोडा वेळ तसंच ते एकमेकांची साथ अनुभवत राहतात....


मित्रांनो असं म्हटलं जातं की, ज्योड्या स्वर्गात बनतात. आपण त्या फक्त जुळवण्याचं काम करत असतो. जर तुमच्या आयुष्याचा दोर एखाद्याशी बांधला गेला असेल.तर तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...

Saturday, September 29, 2012

पण हल्ली मन थोड कठोर झालय : सध्याची वास्तवता


का कळत नाही, पण हल्ली मन थोड कठोर झालय .

प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय प्रेम, प्रेम, प्रेम, बस झाल आता . 

अरे एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार वारंवार का.

तिलाही माहिती आहे की ती माझी होऊ शकत नाही आणि मलाही माहिती आहे मी तिचा होऊ शकत नाही दोघांची गत अशी झालेली आहे. जस आल्वाच पान आंणि त्यावरचा थेंब , स्पर्श होऊ शकेल पण एक जीव उभ्या जन्मात नाही.
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कघीच पोहचाल्यत आणी तिच्या मनातल्या भावना माझ्या मनात पोहचल्यात. दोघांच्या भावनेत प्रेम आहे हे दोघनाही माहिती आहे. पण या भावना स्पष्ट का होत नाहीत . नाही ते कघीच होणार नाही ,त्या मागे एकच कारण असाव दोघांनाही एकच बंधनाने जखडून ठेवलय ……..संस्कार .
माझ्या लाडलीला लहानाच मोठ केले ,पोरीने जे मागीतल ते बापान पुरावल , पण शेवटी काय माजी पोरगी पलुन गेली . रस्त्यानी जाताना बायकांची होणारी ती कुजबुज ही बघ हीच पोरगी पलुन गेली त्या दिवशी अशा यातनेने माझ्या मायेच्या कालजाला चीरा पडू नयेत म्हणुन ...
पोराला लहानाचा मोठा केला , स्वतः फाटकी गंजी घातली पण पोराच्या कपड्याची इस्त्री कधी चुकवली नाही .
अरे काय नाही केल माझ्या बापान माझ्यासाठी स्वतःच्या पोठाची खलगी केली , पण मला या लेकाला computer engeeniner बनवल , बापान एकच मगितल माझ्याकडे पोरा आपल्या जातिचीच पोरगी कर हा लेका .आयुष्यात एकच गोष्ट मागितली बापान आनी मी तीही पूर्ण करू नये.
खरच संस्कार म्हणजे बंघन ………….नाही 
संस्कृती जपण्यासाठी दोन जिवांचा लागलेला लअला म्हणजे संस्कार आनी मग या लळ्या पुढे बाकी सर्वच गोष्ठी स्वः आणि मग आम्ही म्हणतो आमच्या नशिबात प्रेमच नाही

"खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

लग्न हे तसं  प्रत्येकाच्याच पाचवीला  पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.  
 

या जगात परफेक्ट  असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.  


आपल्या मनासारखीच  समोरची व्यक्ती हवी असा  अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका. 


लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा  मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही " 


मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.  


मुलाच्या किंवा  मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती  दिसायला तशीच असेन असा  ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.  


मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.  


हिच्यापेक्षा  ही जास्त चांगली वाटते  किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.  


असं म्हणतात  की मुलीच्या आई वरुन मुलगी  कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! ) 


पाहण्याच्या कार्यक्रमात  आपल्या बरोबर जे लोक असतात  त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.  


लग्नाला उभ्या  राहिलेल्या सगळ्यांच्या  मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?  


मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.

मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच. 

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.