तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होईल, पुसणारा हात अडला…
नाव ख़राब होईल, पुसणारा हात अडला…
दोन-चार थेंब तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,’ती’ माझ्यासाठी रडली होती,
एक थेंब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भिती वाटली होती.
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भिती वाटली होती.
‘आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं’..,
यावरही एक थेंब पडला,
यावरही एक थेंब पडला,
‘ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला…
तो भाबडा बोल आठवला…
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
‘आहेर आणू नये ‘ यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता…
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता…
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली…
आज घरी दिसली....
तर सुंदर असणं महत्वाचं आहे
‘ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
ReplyDeleteतो भाबडा बोल आठवला… +1
सुंदरच...
भन्नाट लिहितोस रे !!!!
keep it up....
Simply Great... I like it very much.. The perfect reality..!!
ReplyDelete