प्रेम असा विषय निघाला की लैला आणि मजनू ही नावं आली नाही तर नवल. एवढा या नावाचा आणि प्रेमाचा संबंध आहे. किंबहूना प्रेम कसं हवं तर लैला मजनूसारखं असा प्रेमाचा निकषही ठरला आहे. पण हे लैला मजनू नेमके होते कोण? त्यांची प्रेमकहाणी नेमकी आहे तरी काय? हे बर्याचदा माहित नसतं. त्या अमर प्रेमाचीच ही कथा.
अरबस्तानातील अब्जोपती शाह अमारीचा मुलगा कॅसला लहानपणापासूनच इश्काचा स्पर्श झालेला. एका ज्योतिषाने त्याला पाहताक्षणी सांगितलं याच्या आयुष्यात प्रेमाला फार महत्त्व आहे. त्यासाठी तो काहीही करेल. ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरावी यासाठी शाह अमारीने खूप प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थ ठरले.
पुढे एकदा दमास्कसमध्ये मदरशात शिकण्यासाठी गेलेल्या मजनूने नाजदच्या शहाची मुलगील लैलाला पाहिलं आणि बेटा पहिल्या कटाक्षात घायाळ झाला. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. मौलवीने त्याला प्रेम बिम झूठ असल्याचं सांगून त्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं सांगतिलं. पण प्रेमात आकंठ बुडालेला कैस ऐकायला कसा तयार होईल? त्याच रोगाची लागण लैलालाही झाली. पुढे याची परिणती लैलाला घरात कोंडून ठेवण्यात झाली. लैलाचा विरह कॅसला सहन होईना. तो वेड्यासारखा भटकू लागला. त्याचे हे प्रेम पाहून लोकांनी त्याला मजनू म्हणायला सुरवात केली. ते नाव आजही टिकून आहे. प्रेम या शब्दाला मजनू हा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो, यातच काय ते आले.
लैला व मजनू यांना वेगळे करण्याचे खूप प्रयत्न झाले. पण निष्फळ ठरले. लैलाचे बख्त नावाच्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. पण तिने नवर्याला आपण फक्त मजनूचे आहोत, असे स्पष्ट सांगितले. त्याच्याशिवाय आपल्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, असे सांगितले. बख्तने तिला तलाक दिला. आता मजनूच्या प्रेमाने वेडी झालेली लैला त्याच्या शोधात जंगलात फिरू लागली. अखेरीस तिला मजनू मिळाला तेव्हा दोघेही प्रेमपाशात बद्ध झाले. पण लैलाच्या आईने त्यांना वेगळे केले आणि लैलाला ती घरी घेऊन गेली.
विरहाच्या दुःखानेच लैलाचा मृत्यू झाला. लैलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर मजनूचेही प्राणपाखरू उडून गेले. त्याच्यानंतर त्या दोघांच्या प्रेमाची खोली लोकांना कळून आली. अखेर त्या दोघांना जवळ जवळ दफन करण्यात आले. मात्र त्यांना दफन केले तरी त्यांच्या प्रेमाची कहाणी मात्र अमर झाली आहे.

No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...