Saturday, September 29, 2012

सत्य उघड केलंच पाहीजे...

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता! 
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा! 
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?" 
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला. 
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती! 
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. 
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! 
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती. 
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने! 
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... 
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. 
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

नुसता भडक दिखावा आणि खोकली स्टायील...

तुझी ग्लेमरची आवड मी समजू शकतो,
फ़ेशनेबल जगात राहायचं कसं,हे हि उमजू शकतो;
एक एक उच्च ब्रांड,जुळवतात आगळीच फ्रेज,
इतकी गं कशी तुला या आधुनिकतेची क्रेज;
नुसता भडक दिखावा आणि खोकली स्टायील,
फोने वाजालाही नाही तरी,लावा कानी मोबायील;
इंग्रजी आलं नाही तर म्हणायचं, ओ माय गुआड, 
वापरायची अक्कल शून्य असली तरी,असावा आय पुआड;
पाय मुरगळला तरी हवी, पायाखाली हाय हिल,
मग पैसे कितीही लागले तरी,भर डॉक्टरांचे बिल;
वासनिक  वृत्तीच्या मित्रान- बरोबर करायचे नायटिंग,,
इंच भर वाढायला नको म्हणून, करायचे डायटिंग;
मग एटिकेट्स म्हणून ड्रिंक्स करून,बनायचं पब्लिक प्रोपर्टी,
वेडा वाकडा प्रकार झाला कि,कोणाचं पाप याची नाही गेरेनटी;
म्हणून सांगतो ऐक...
आपली सौन्स्कृती हीच खरी,प्रगल्भित परंपरा,
झाकलं सौंदर्य,जणू लाक्षिमी,सरस्वती श्वेतांबरा;
जिला आजही मिळतो जगी, मानाचा मुजरा,
उत्तुंग काव्य रचवतो,केशी मळलेला गजरा;
वेडे वाकडे कट्स ला लाजवते, एक लांब सरळ वेणी,
घायाळ करते प्रियकरास,काजळीत नजर पापणी;
तिच्या येण्याची चाहूल नेहेमी ठेवते,सख्यास कोंदण,
आजन्म पदरी बांधते,नाजूक पाउली झ्न्करीत पैंजण;
जिच्या विचारीच,नैसर्गिक निर्गुण निरंकार,
पृथ्वी तलावर जिचा, लाज हाच अलंकार;
म्हणून सर्व जगी भारतीय नारी,हि उच्च पारडिच बसते,
जी उत्सुकता झाकण्यात आहे,ती दाखवण्यात नसते.;
बिना फुल-वाती दिव्याची,रात पूजाच काय,
काही झाकालंच नाही तर,उघडायची मजाच काय

आता तरी नजरेस पड शेवटच्या श्वासाला ...

कशी  समजूत घालू माझ्या वेड्या मनाला 
तू नाही आता जवळ सांगू कुणाला 
  
दिवसातून कितेकदा पाहतो तपासून मोबाइला 
नाही येणार तुझा आता फोन सांगणा माझ्या वेड्या मनाला 

कसे विसरावे गोडवा  तुझ्या मिठीतला 
अजूनही तुझी  आस माझ्या वेड्या मनाला 

तुझे ते गोजिरवाणे हसणे आठवे माझ्या वेड्या मनाला 
मी मात्र विसरलो आता गालातल्या गालात हसण्याला 

आस तुझ्या प्रीतीची  लागली आता जीवाला 
अजून किती घायाळ करी माझ्या वेड्या मनाला 
  
अजूनही नाही पटले तुझे जाने  माझ्या वेड्या मनाला 
कधीतरी दिसशील माझ्या आतुरलेल्या नजरेला 
  
का नाही कळले माझ्या वेड्या मनाला 
नाही काही  उरले आता मला गमवायला 

जीव झाला वेडापिसा तुला एकदा पाहायला 
काहीच कसे काळे ना माझ्या वेड्या मनाला 
  
तुजीच आस लागली माझ्या वेड्या मनाला 
आता तरी नजरेस पड शेवटच्या श्वासाला 

आता आठवतायत ते फक्त....

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... 

Friday, September 28, 2012

एक छोटासा संवाद :मी अजूनही तुझ्यावर तितकंच....

आज दुपारी ऑफिस मध्ये,
कामाच्या गडबडीत नेहमी सारखाच गुंतलो होतो...
इतक्यात फोन वाजला.. उचलायचा न्हव्ताच  मुळी...
शेवटची रिंग वाजेपर्यंत उचललाच  नाही...
मग शेवटी एकदाचा उचलून कानाला लावला...
आणि जमेल तितक्या चिडक्या आवाजात हॅलो म्हणालो...
पलीकडून कोणी बोललच नाही...
माझी चीड चीड जास्तच वाढली...चार शिव्याही  द्यव्याशा वाटल्या....
पण पलीकडची  शांतता खूपच गंभीर वाटत होती...
चार दिवासापूर्वी आलेल्या ब्लॅंक मेसेज ची आठवण करून देत होती...
कोणीतरी जवळच असल्याची जाणीव वाढत चालली होती...
क्षणभर हरवलो... पण लगेच सावरलो.. चिडून फोने ठेवणार इतक्यात....
"कसा आहेस....? ? ?"
फक्त दोनच शब्द कोणीतरी बोलले आणि सगळच सांगून गेले...
मन कधीच जुन्या आठवणींच्या मागे धावत सुटले होते...थेट गावाच्या वेशीवर जाऊन  थांबले होते...
बाकुळीचा पार... नदीचा घाट... देवलाकडए  जाणारी पायवाट...
चंद्राच्या  सगळयात जवळची चांदणी... भातुकलीच्या खेळातली राजा राणी...
आणि मी निघताना साठलेल डोळ्यातल पाणी.... आज माझ्याही डोळ्यातून वाहत होत...
ऑफीस मधल्यांची  नजर चुकवून पटकन डोळे पुसले....
फोन घेऊन बाजूला निघून गेलो.. एकंतात.....
काही पुढे बोलन दोघांनाही जमत न्हवत...
खोलवर आत काहीतरी दुखत होत....
चालू होत फक्त श्वासांच संभाषण हुंदके देत होत गहीवरलेल मन....
पापण्यान मधल पाणी गलांवर ओघळत होत...
जुनी प्रत्येक आठवण जागी करत होत....
हजारो प्रश्न येऊन ओठांवर थांबले होते... म्हणूंनच कदाचित ओठ थरथरत होते...
मधूनच तिच्या काकनांची  किन कीन ऐकू येत होती...
जणू डोळ्यातल पाणी लपवायचा ती व्यर्थ प्रयत्न करीत होती...
कितीतरी क्षणांची गोळा बेरीज करायची राहिली होती....
अचानक सगळी न सुटलेली गनित समोर उभी ठाकली होती....
त्यातच पलीकडे अस्पष्ट अशी ती उभी होती....
तिला पाहायचा खूप प्रयत्न केला...
पण जीव नुसताच आठवणींच्या जाळ्यात गुरफाटत गेला...
त्याच क्षणी पालीकडून एक हुंदाका ऐकू आला...
मला पुन्हा एकदा वास्तवात परत घेऊन आला....
पुढचे हुंदके सहन करायची हिंमत माझ्यात न्हव्ाती...
म्हणूंच स्वताला सावरले...
हजार प्रश्नाना बाजूला सारून फक्त "बरा आहे.. " एवढेच म्हटले...
अश्रूंमधे भिजलेले ओठ पालीकडून फक्त मूक हसले...
आणि आमचे फोन वरचे ते संभाषण तिथेच संपले....

शेवटी तीच म्हणाली ...

तिच्याशी कसं बोलावं ,
हे कळायचंच नाही ..
मनात रूळलेल्या शब्दांची गाडी,
जिभेवरती कधी वळायचीच नाही... ::) 

                  तिच्याशी निखळ बोलतोय मी ,
                  हा केवळ भास असायचा ..
                  मनातील भावनांना डावलणारा,
                  विषय फ़क्त अभ्यास असायचा... :( 

ती दुर गेल्यावर मला,
नेहमीच कविता सुचायची...
पण समोर दिसताच ती ,
M3 back  राहिल्यासारखी अवस्था माझी व्हायची ... :-[ 

                तिच्या - माझ्या भेटीत ,
                रोज नविन डेरिवेशन असायचं .....
                अनं बघुन तिचं स्मित-हास्य ,
                मला डिप्रेशन यायचं ......

मित्रांनी दिल्यावर सजेशन ,
मग मी ही भेटलो विदाउट डिप्रेशन ....
पण साला यावेळीही घोळ झाला,
सबमिशन नावाचा विलन सामोरी आला ..... :'( 

               बघुन माझे सारे,
               गोंधळ हे वेडपट .....
               शेवटी तीच म्हणाली ,
               I LIKE  YOU TEDDY BEAR बावळट .....

संसार माझा सुखाचा???

जीवन आणि संसाराचा  विरह हा एक भाग असतो 
म्हणूनच मनुष्य तेव्हां  आत्म परीक्षण करतो ।
संसारात होते वाटले  माणूस 'स्व' विसरून जातो 
अनुभवास मात्र येते 'स्व' तसाच कायम असतो ।
मी मला कसा,तसेच   दुसऱ्याला कसा वाटतो 
ह्याचे ज्ञान प्राप्त होऊन  'मी' फार तोकडा पडतो ।
जर काहीं विसरत असेल  तर तो दुसऱ्यास विसरतो 
त्याच्याकडे फक्त तो   एक छाया म्हणून बघतो ।
प्रीति,प्रेम,साथी हा   फक्त एक आभास ठरतो 
भावनांनाही त्यांत अखेर   कुठे ही ना वाव उरतो ।
जीवनांत अशा विचाराला  कधींच कुठं थारा नसतो ।
पण 'मी-माझं' म्हण्णार्याला  तो विचार कधीं ना शिवतो 
जीवनांत माणूस एकटा आहे  तो एकटाच रहात असतो ।
हेंच एक सत्य आहे   बाकी सर्व आभासच असतो ।
त्यांच आभासांत राहून   मनुष्य जीवन जगत असतो 
संसार माझा सुखाचा  असेच भासवत  असतो । 
म्हणूनच विरहांत जेव्हां   आत्म परीक्षण मी करतो 
प्रीति -संसारावरील सारा  विश्वासच उडून जातो ।। 

अंतर वाढलंय???

अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात

 तु आता दुर राहतेस
 तरी तुझी आठवण येते
 
चाफा फुललाय मला भेटलाही
 पण सुगंध देणं मात्र विसरलाय
 कारण ते तर तुझ्यासाठी होतं

 खरंच शोना..

 तुझी आठवण  सारखी येते
 पण तुला  सांगता येत नाही
 कारण ..??
 ही रात्र पहील्यासारखी थांबत नाही
 तुझी वाट पाहण्याची सवय
 हया चंद्राने मात्र सोडलीय
 हो माझे आजही तसेच आहे
 जागतोय रात्री तरी
 डोळे मात्र उघडेच आहेत..

 अंतर खरच वाढलंय ..!

 कारण तु आज सासरच्या दारात आहेस
 अन मी मरणाच्या

 तुला कधीच जाणवणार नाही
 मी कधी गेलोय

 हो पण नक्कीच वेळ येईल अशी
 कळेल तुलाही मी मेलोय..

 अंतर खुप वाढलंय..

 मी फक्त आठवण बनुन राहीलोय
 तु नाही पण  मित्रांनी अश्रु वाहीलेत
 मी तर हतबल झालो मी येउ शकत नाही

 पुन्हा जगावं वाटतं
 पण..
 तो देह आता माझा वाटत नाही

 अंतर खुप वाढलंय.. !

माझ्या प्रेम कहाणीचा सुखद अंत करायला जमलेच नाही .....!!

जमलंच नाही ....!!
तूला  सांगायला
तू  जवळ असताना  जमलंच    नाही
नजरांनि  नजरांशी  बोलायला ...
प्रेमाच्या  सरीत  थोडावेळ भिजायला

जमलंच नाही  तुझ्या  डोळ्यांमध्ये पाहायला 
पाहायचो  चोरून  कधी तू  तर कधी मी
खरच  हिम्मत  झालीच  नाही हात धरण्याचा 
प्रेम खूप  आहे  तुझ्यावर
मला मिठीत घे ना बोलायला

जमलंच नाही  ....!!

आजवर एकांतात जगलो
वाटलं  तुझी  साथ  मिळावी
पण  नेमके तुझे  लग्न ठरले
जमलंच नाही रे शेवट पर्यंत
माझे  हे प्रेम सांगायला...

माझ्या प्रेम कहाणीचा सुखद अंत करायला
जमलेच नाही .....!!  

आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये ?

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
 
कळीचे होते गुलाब ,गुलाब कोणी मागू नये 
ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे कोणी टोचू नये 
असे वाटते आजकाल ,कोणासाठी जगू नये 
 
कल्पनेचा खेळ सारा,काव्य कोणी मागू नये 
गोंदा मनी अक्षरे सारे,कागद कोणी फाडू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये 
 
जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये 
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
 
मी तिचा ती माझी,तीचासाठी कोणी जगू नये
वेगळे तिचे जग सारे,प्रेमामध्ये कोणी पडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
   
आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये 
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये