Thursday, July 28, 2011

आठवेन मी तुला..

आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,

तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,

दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,

तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,

तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,

तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,

तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,

दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात

तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,

आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी


तुला..
असाच आहे मी

भेटीचा हर्ष...

छान एका बागेत भेटण्याचे ठरले.
मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता
नाक मुरडले.
जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती
आज चक्क सलवार घालून आली होती
बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती
अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले
तू कुठे गेला होतास?रागातच तिचे विचारणे
आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास
कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास
चल बसुया आत
भलताच दिसतोय वेगात
तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या
डोळ्यावर भिरकावत विचारले......
तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?
हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण
असा कसा रे तू अनरोमांटिक
अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक
रागाने उठून गेली ती तरातरा
मीही तिच्या मागे गेलो भराभरा
हातात घेउनी तिचा हात
म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज
कसला चढलाय तुझ्या रुपाला साज
बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......
आवडते मला तुझे रागावणे
काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे
नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे
देशील का मला माझे हवे ते मागणे
काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे
मला हवे आहे तुझ्या ओठांचे तराणे
गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे
हवा आहे तुझा मखमली स्पर्श
वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष
लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली
तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली
चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली
रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली

आनंदवनभुवनी

आनंदवनभुवनी

जन्म दु:खे जरा दुखे |नित्य दुखे पुन्ह्पुन्हा |
ससार त्यागणे |आनंदवनभुवना ||
वेधले चित्त जाणावे |रामवेधी निरंतरी |
रागे हो वीतरागे हो |आनंदवनभुवना ||
संसार वोढीता दुखे |ज्याचे त्यासीच ठाउके |
परंतू येकदा जावे |आनंदवनभुवना ||
न सोसे दुख ते होते | दुख शोक परोपरी |
येकाकी येकदा जावे |आनंद्वनभुवना ||
कष्टलो कष्टलो देवा |पुरे संसार जाहाला |
देहत्यागासी येणे हो | आनंदवनभुवना ||
जन्म ते सोसिले मोठे | अपाय बहुतांपरी |
उपाये धाडिले देवे | आनंदवनभुवना ||
स्वप्नी जे देखिले रात्री | तें तें तैसेची होतसे |
हिंडता फिरता गेलो |आनंदवनभुवना ||
जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|
विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||
स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली |
लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||
विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला |
धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||
हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |
हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||
खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |
कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||
ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||
सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||
त्रैलोक्य चालिले तेथे | देव गंधर्व मानवी |ऋशी मुनी महायोगी |आनंदवनभुवनी ||
आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||
त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||
सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||
देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||
दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||
मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||
राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||
आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छेबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||
वीजई दिस जो आहे | ते दिसी सर्व उठती |अनर्थ मांडला मोठा |आनंदवनभुवनी ||
देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |
मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||
कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |
कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||
बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |
अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी ||
पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |
कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||
त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |
कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||
भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |
लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||
येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |
संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||
बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |
मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी ||
बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |
ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||
गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |
निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||
उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |
जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||
नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |
गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |
चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||
बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |
राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||
देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |
पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी ||
रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |
मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |
नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी ||


अंतर्भाव

ऐक शिष्या सावधान | येकाग्र करुनिया मन |
तुवां पुसिले अनुसंधान | अंत समयीचे ||
तरी अंत कोणासी आला | कोण मृत्याते पावला |
हा तुवां विचार केला |पाहिजे आता ||
अंत आत्म्याच्या माथा | हे तो न घडे सर्वथा |
सस्वरूपी मरणाची वार्ता | बोलोंचि नये | |
स्वरूपी तो अंत नाही | येथे पाहणे न लगे काही |
मृगजळाच्या डोही | बुडो चि नको ||
आतां मृत्य देहासी घडे | तरी ते अचेतन बापुडे |
शवास मृत्यू न घडे | कदा कल्पांती ||
आता मृत्य कोठे आहे | बरे शोधूनि पाहे |
शिष्य विस्मित होऊनि राहे | क्षण येक निवांत ||
मग पाहे स्वामीकडे | म्हणे हा देह कैसा पडे |
चालविता कोणीकडे | निघोनी गेला ||
देह चालवितो कोण | हे मज सांगावी खूण |
येरू म्हणे हा प्राण | पंचकरूप ||
प्राणास कोणाची सत्ता | येरू म्हणे स्वरूप सत्ता |
सत्ता रूपे तत्वता | माया जाण ||
मायेची माईक स्थिती | ऐसे सर्वत्र बोलती |
माया पाहातां आदी अंती | कोठेची नाही ||
अज्ञानासी भ्रांति आली |तेणे दृष्टी तरळली |
तेणे गुणे आडळली | नस्ती च माया ||
शिष्या होई सावचित्त | मायेचा जो शुध्द प्रांत |
तोचि चौदेहाचा अंत | सद्गुरू बोधे ||
चत्वार देहाच्या अंती | उरली शुध्द स्वरूप स्थिती |
तेणे गुणे तुझी प्राप्ती |तुजसी झाली ||
जन्मला चि नाही अनंत | तयास कैचा येईल अंत |
आदि अंती निवांत | तो चि तू आप घा ||
स्वामी म्हणती शिष्यासी |आता संदेह धरिसी |
तरी श्रीमुखावरी खासी | निश्चयेसी ||
देह्बुध्दिचेनी बळे |शुध्द ज्ञान ते झांकोळे |
भ्रांती हृदयी प्रबळे | संदेह रूप ||
म्हणोनि देहातीत ते सुख | त्याचा करावा विवेक |
तेणे गुणे अविवेक |बाधू न शके ||
तुटले संशयाचे मूळ |फिटले भ्रांतीचे पडळ |
तयास अंत केवळ | मूर्खपणे भ्रांती ||
जे जन्मलेची नाही |त्यासी मृत्यू चिंतीसी कायी |
मृगजळाचा डोही |बुडोची नको ||
मनाचा करूनी जयो |याचा करावा निश्चयो |
दृढ निश्चये अंत समयो |होऊनि गेला ||
आदि करूनी देहबुद्धी | देह टाकीला प्रारब्धी |
आपण देहाचा संबंधी | मुळीच नाही ||
अस्ते करुनी वाव |नस्त्याचा पुसूनी ठाव |
देहातीत अंतर्भाव |अस्ते खुणेने असावे ||
हे समाधान उत्तम | अस्तेपणाचे जे वर्म |
देहबुद्धीचे कर्म |तुटो जाणे ||
आता तुटली आशंका | मार्ग फुटला विवेका |
अद्वैत बोधे रंका राज्यपद ||
तंव शिष्ये आक्षेपिले |आता स्वामी दृढ झाले |
तरी हे ऐसे चि बाणले |पाहिजे की ||
निरूपणी वृत्ती गळे |शुध्द ज्ञान प्रबळे |
उठोनी जाता स्वयेची मावळे | वृत्ती मागुती ||
सांगा यासी काय करू | मज सर्वथा न धरे धीरू |
ऐका सावध विचारू | पुढिलीये समासी ||

अंतर्भाव

सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |
सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||
ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |
सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||
जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |
तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||
अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |
ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||
तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |
सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||
म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |
येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||
साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |
तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||
मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |
साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||
चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |
नेम धरिता कासावीस |परम वाटे ||
दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |
विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||
ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |
तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||
तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |
ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||
अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |
कैसे राहे समाधान |तये समयी ||
अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |
प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||
ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |
याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||

अंतर्भाव

प्राप्त जाले ब्रह्मज्ञान | आंगी बाणले पाहिजे पूर्ण |
म्हणोनि हे निरुपण | सावध ऐका ||
कांहीच नेणे तो बध्द | समूळ क्रिया अबध्द |
भाव उठिला तो शुध्द | मुमुक्षु जाणावा ||
कर्मे तजून बाधक | शुध्द वर्ते तो साधक |
क्रिया पालटे विवेक | पाहे नीच नवा ||
तये क्रियेचे लक्षण | आधी स्वधर्म रक्षण |
पुढे अद्वैत श्रवण | केले पाहिजे ||
नित्य नेम दृढ चित्ती | तेणे शुध्द चीतोवृत्ती |
होउनिया भगवंती | मार्ग फुटे ||
नित्य नेमे भ्रांति फिटे | नित्य नेमे सदेह तुटे |
नित्य नेमे लिगटे | समाधान अंगी ||
नित्य नेमे अंतर शुध्द | नित्य नेमे वाढे बोध |
नित्य नेमे बहु खेद | प्रपंची नुठी ||
नित्य नेमे सत्व चढे | नित्य नेमे शांती वाढे |
नित्य नेमे मोडे | देहबुद्धी ||
नित्य नेमे दृढभाव | नित्य नेमे भेटे देव |
नित्य नेमे पुसे ठाव | अविद्येचा ||
नित्य नेम करू कोण | ऐसा शिष्ये केला प्रश्न |
केले पाहिजे श्रवण | प्रत्ययी स्वयें ||
मानसपूजा जप ध्यान | येकाग्र करूनिया मन |
त्रिकाळ घ्यावे दर्शन | मारुती सूर्याचे ||
हरिकथा निरुपण | प्रत्यई करावे श्रवण |
निरूपणी उणखूण | केली पाहिजे ||
संकटी श्रवण न घडे | बळात्कारे अंतर पडे |
तरी अंतरस्थिती मोडे | ऐसे न कीजे ||
अंतरी पांच नामें | म्हणत जावी नित्य नेमे |
ऐसे वर्तता भ्रमे | बाधिजेना ||
ऐसी साधकाची स्थिती | साधके राहावे ऐसिया रिती |
साधनेवीण ज्ञानप्राप्ती |होणार नाही ||
तव शिष्य म्हणे जी ताता | जन्म गेला साधन करता |
कोण वेळ आता | पावो समाधान ||
कैसे येईल सिद्धपण | केव्हा तुटेल साधन |
मुक्त दशा सुलक्षण | मज प्राप्त केवी ||
आता याचे प्रत्योत्यर | श्रोती व्हावे सादर |
ऐका पुढे विस्तार | सांगिजेल ||
इति श्री अंतर्भावं | जन्ममृत्यू समूळ वाव |
रामदासी गुरुराव |प्रसन्न जाला ||

अंतर्भाव

ऐक शिष्या सावधान | सिद्ध असता निजबोध |
माईक हा देहसमंध | तुज बाधी ||
बद्धके कर्मे केली | ते पाहिजे भोगिली |
देह बुद्धी दृढ झाली |म्हणोनिया ||
मागे जे जे संचित केले |ते ते पाहिजे भोगिले |
शूद्रे सेत जरी टाकिले | तरी बाकी सुटेना ||
हा तो देहबुद्धीचा भाव | स्वस्वरूपी समूळ वाव |
परंतु प्राप्तीचा उपाव | सुचला पाहिजे ||
स्वरूप लंकापुरी | हेम इटा दुरीच्या दुरी |
देहबुद्धीचा सागरी | तरले पाहिजे ||
विषयमोळ्या बाहो सांडी | मग त्यास म्हणे कोण काबाडी |
तैसी पदार्थाची गोडी |सांडीत आत्मा ||
देहबुद्धीचे लक्षण | दिसेंदिस होता क्षीण |
तदुपरी बाणे खूण | आत्मयाची ||
सर्व आत्मा ऐसे बोलता |अंगी बाणे सर्वथा |
साधनेवीण ज्ञानवार्ता |बोलोची नये ||
दस-याचे सोने लुटले | तेणे काय हातासी आले |
कि राय विनोदे आणिले |सुखासन ||
तैसे शब्दी ब्रह्मज्ञान |बोलतां नव्हे समाधान |
म्हणोनिया आधी साधन |केले पाहिजे ||
शब्दी जेविता तृप्ती जाली |हे तो वार्ता नाही ऐकिली |
पाक निष्पत्ती पाहिजे केली |साक्षपे स्वयें ||
कांहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेवीण |
मा हे ब्रह्मज्ञान परम कठीण | साधनेवीण केवी ||
शिष्य म्हणे सद्गुरू |साधन तरी काय करू |
जेणे पाविजे पारू |माहा दु:खांचा ||
आता पुढिलीये समासी | स्वामी सागती साधनासी |
सावध श्रोती कथेसी |अवधान द्यावे ||

अंतर्भाव

जय जय सद्गुरू समर्था | जय जया पूर्ण मनोरथा |
चरणी ठेउनिया माथा | प्रार्थितसे ||
मी येक संसारी गुंतला | स्वामीपदी वियोग जाला |
तेणे गुणे आळ आला |मज मीपणाचा ||
इच्छाबंधने गुंतलो | तेणे गुणे अंतरलो |
आता तेथूनि सोडविलो | पाहिजे दातारे ||
प्रपंच संसार उद्वेगे |क्षणक्षण मानस भंगे |
कुळाभिमान म्हणे उगे | सामाधानासी ||
तेणे समाधान चळे | विवेक उडोनिया पळे |
बळेची वृत्ती ढांसाळे | संगदोषे ||
स्वामी प्रपंचाचे नि गुणे | परमार्थासी आले उणे |
ईश्वर आज्ञेप्रमाणे | क्रिया न घडे ||
याचिया दु:खे झोंका आदळे चित्ती | समाधान राखणे किती |
विक्षेप होता चितोवृत्ती | दंडळू लागे ||
प्रपंचे केले कासावीस | होउ नेदी उमस |
तेणे गुणे उपजे त्रास | सर्वत्राचा ||
आता असो हा संसार | जाले दु:खाचे डोंगर |
स्वामी अंतसार्क्ष विचार | सर्व हि जाणती ||
तरी आता काय जी करावे | कोण्या समाधाने असावे |
हे मज दातारे सांगावे | कृपा करावी ||
ऐसी शिष्याची करुणा | ऐकोनी बोले गुरुराणा |
केली पाहिजे विचारणा | पुढिलीये समासी ||

आनंदवनभुवनी

भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा |
भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||
आरोग्य जाहाली काया | वैभवे सांडिली सीमा |
सार सर्वस्व देवाचे | आनंदवनभुवनी ||
देव सर्वस्व भक्तांचा | देव भक्त दुजे नसे |
संदेह तुटला मोठा | आनंदवनभुवनी ||
देव भक्त येक जाले |मिळाले सर्व जीव ही |
संतोष पावले तेथे | आनंदवनभुवनी ||
सामर्थ्ये यशकीर्तीची | प्रतापे सांडिली सीमा |
ब्रीदेंची दिधली सर्वे | आनंदवनभुवनी ||
राम कर्ता राम भोक्ता | रामराज्य भूमंडळी |
सर्वस्व मीच देवांचा |माझा देव कसा म्हणों ||
हेंच शोधूनी पहावे |राहावे निश्चळी सदा |
सार्थक श्रवणे होते | आनंदवनभुवनी ||
वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |
कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||
गीत सगीत सामर्थ्ये | वाद्य कल्लोळ उठिला |
मिळाले सर्व अर्थार्थी | आनंदवनभुवनी ||
वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |
आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||
मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |
कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||
येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती |
सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||
उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |
ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||
बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |
पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||
स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |
काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||
महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी |
विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी ||
सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |
वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||
जय जय रघुवीर समर्थ !

आनंदवनभुवनी

आनंदवनभुवनी
देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |
मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||
कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |
कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||
बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |
अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी ||
पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |
कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||
त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |
कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||
भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |
लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||
येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |
संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||
बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |
मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी ||
बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |
ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||
गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |
निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||
उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |
जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||
नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |
गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |
चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||
बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |
राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||
देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |
पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी ||
रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |
मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |
नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी ||

जीवन ही एक शाळा आहे


जीवन ही एक शाळा आहे , मन होई फळा इथे
आयुष्यातील क्लिष्ट प्रमेय सोडवता येतात तिथे
आयुष्य हे जिवंत अध्यात्म , याच्या तत्वासमोर वेदही थिटे
मौनात अनुभवता दोन क्षण , इथे ईश्वर ही भेटे
जीवन हे सुंदर आहे , नसतात इथे फक्त दुःखाचे क्षण ,
डोळसपणे पाहता बाजूला , सुखाचे गवसती अनेक क्षण
जीवन खरेच सुंदर आहे , पाहण्या एक नजर हवी
निसटनारे गोड क्षण टिपन्यास, ती तिथे हजर हवी


जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे ,जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे
जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे , करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे
जीवनात बरच काही देण्यासारखे आहे , देता देता बरेच काही घेण्यासारखे आहे
जीवनात बरेच काही फुलवता येते , इथे बरेच काही चांगले पेरन्या सारखे आहे
जीवन मोहक फुलासारखे असते , पवित्र प्रेमाने मन मोहवणारे असते
जरी सुकले तरी ते , आठवनिंच्या पुस्तकात जपण्यासाठी असते

Wednesday, July 27, 2011

प्रेम म्हणजे काय हें त्याना कळालेलंच नसतं..

खरचं मन खुप वेडं असतं..
प्रेमाच्या नावाखाली नसते उद्योग करतं
नेहमी कोणाच्यातरी मागे धावतं असतं
रात्रंदिवस कोणालातरी शोधत असतं...
खरचं मन खुप वेडं असतं..
सगळीकड़े शोधून शेवटी एकापाशी जावून थांबतं
आपल्या हृदयात त्याला साठवून घेतं..
अणि त्यालाच आपलं आयुष्य बनवून बसतं..
खरचं मन खुप वेडं असतं..
त्या एका व्यक्तिसाठी आपला सारा वेळ घालवतं
त्याच्यासाठी रात्र रात्र जगुन काढतं..
त्याच्या आठवणीत गुंग होवून जातं...
खरचं मन खुप वेडं असतं..
ह्रुदयातल्या त्या व्यक्तिशी अचानक भांडण होतं
एवढे जूळलेलं नातं एकदम Break-up घेतं..
अनं कारण शोधण्यात ते आणखी काही दिवस वाया घालवतं...
Break-up घेण्यामागं काहीच कारण नसतं..
प्रेम म्हणजे काय हें त्याना कळालेलंच नसतं..
पुन्हा मन भटकत जातं अन पुन्हा एकापाशी जावून थांबतं...
खरचं ना....मन खुप वेडं असतं............

उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ,

उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ,
मी एकटाच पाखरासारखा भिरभिरणारा ,
आपल्याच घराची वा...ट चुकणारा ,
कुणी दिसतंय का ? मला रस्ता दाखवणारं ,
भरल्या डोळ्यांनी तुला शोधणारा .
कुठे होतीस तू .
माझे असा काय चुकलं होतं ,
मी तुझ्यावर प्रेम केलं होतं ,
कदर माझ्या प्रेमाची झालीच नाही .
तुला माझी आठवण कधी आलीच नाही .
उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू .
मला माफ कर एवढंच बोललीस ,
परत कधी न भेटण्याची विनवणी केलीस ,
जाता जाता आयुष्यातून , रंगच काढून गेलीस ,
बेरंग जगलो .
म्हणूनच उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ?
काळाने जखमांची भरणी केली ,
रडून रडून पापणी सुकून गेली .
तेव्हा उमगले चूक करतोय ,
मी कुणासाठी मरतोय ,
परत पंख सावरले , आकाशात उडण्यासाठी ,
म्हणूनच उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ?
आता कुठे सावरलो होतो ,
उंच भराऱ्या घेत होतो .
न कसली चिंता , नको आधार कुणाचा .
आता मी आनंदी होतो .
नियतीला का मान्य नाही ,
का असा खेळ खेळते ,
सर्वे काही सुरळीत असताना ,
परत तुझी चाहूल येते ,
मी आलेय ,मला स्वीकार ,
मला परत तुझे व्हायचं ,
झाल्या चुका माफ कर .
आता फक्त तुझ्यासोबत जगायचं .
म्हणूनच , उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू .?
परत प्रश्नांचा भडीमार ! उत्तरांची कमतरता !
परत माझ्या जगण्यात , परत आली अस्वथता !
आता फक्त एकंच प्रश्न तुला विचारायचं !
कुठे होतीस तू ? आहे का उत्तर ?
उत्तर हवंय .
माझ्या आठवणींच ,
तुझी वेडी वाट पाहण्याचं ,
उत्तर हवंय ,
माझ्या बेरंग जगण्याच ,
एकटं फिरण्याचं ,
कधी न विसरणार्या , त्या अमोल क्षणाचं !

Wednesday, July 13, 2011

What is this? --- LoVe...

Some time ago, a man punished his 3-year-old daughter for wasting a roll of gold wrapping paper. Money was tight and he became infuriated when the child tried to decorate a box to put under the Christmas tree.
Nevertheless, the little girl brought the gift to her father the next morning and said, “This is for you, Daddy.” He was embarrassed by his earlier overreaction, but his anger flared again when he found the box was empty.
He yelled at her, “Don’t you know that when you give someone a present, there’s supposed to be something inside it?”
The little girl looked up at him with tears in her eyes and said,”Oh, Daddy, it is not empty. I blew kisses into the box. All for you, Daddy.”
The father was crushed. He put his arms around his little girl, and he begged for her forgiveness.
It is told that the man kept that gold box by his bed for years and whenever he was discouraged, he would take out an imaginary kiss and remember the love of the child who had put it there.
In a very real sense, each of us as humans have been given a gold container filled with unconditional love and kisses from our children, friends, family and God. There is no more precious possession anyone could hold.

Believe.......

There may be days when you get up in the morning and things aren’t the way you had hoped they would be.
That’s when you have to tell yourself that things will get better. There are times when people disappoint you and let you down.
But those are the times when you must remind yourself to trust your own judgments and opinions, to keep your life focused on believing in yourself.
There will be challenges to face and changes to make in your life, and it is up to you to accept them.
Constantly keep yourself headed in the right direction for you. It may not be easy at times, but in those times of struggle you will find a stronger sense of who you are.
So when the days come that are filled with frustration and unexpected responsibilities, remember to believe in yourself and all you want your life to be.
Because the challenges and changes will only help you to find the goals that you know are meant to come true for you.
Keep Believing in Yourself!

Because I love you!

One day, a young guy and a young girl fell in love.
But the guy came from a poor family. The girl’s parents weren’t too happy.
So the young man decided not only to court the girl but to court her parents as well. In time, the parents saw that he was a good man and was worthy of their daughter’s hand.
But there was another problem: The man was a soldier. Soon, war broke out and he was being sent overseas for a year. The week before he left, the man knelt on his knee and asked his lady love, “Will you marry me?” She wiped a tear, said yes, and they were engaged. They agreed that when he got back in one year, they would get married.
But tragedy struck. A few days after he left, the girl had a major vehicular accident. It was a head-on collision.
When she woke up in the hospital, she saw her father and mother crying. Immediately, she knew there was something wrong.
She later found out that she suffered brain injury. The part of her brain that controlled her face muscles was damaged. Her once lovely face was now disfigured. She cried as she saw herself in the mirror. “Yesterday, I was beautiful. Today, I’m a monster.” Her body was also covered with so many ugly wounds.
Right there and then, she decided to release her fiance from their promise. She knew he wouldn’t want her anymore. She would forget about him and never see him again.
For one year, the soldier wrote many letters—but she wouldn’t answer. He phoned her many times but she wouldn’t return her calls.
But after one year, the mother walked into her room and announced, “He’s back from the war.”
The girl shouted, “No! Please don’t tell him about me. Don’t tell him I’m here!”
The mother said, “He’s getting married,” and handed her a wedding invitation.
The girl’s heart sank. She knew she still loved him—but she had to forget him now.
With great sadness, she opened the wedding invitation.
And then she saw her name on it!
Confused, she asked, “What is this?”
That was when the young man entered her room with a bouquet of flowers. He knelt beside her and asked, “Will you marry me?”
The girl covered her face with her hands and said, “I’m ugly!”
The man said, “Without your permission, your mother sent me your photos. When I saw your photos, I realized that nothing has changed. You’re still the person I fell in love. You’re still as beautiful as ever. Because I love you!”

Thinking.......

Jerry was the kind of guy you love to hate. He was always in a good mood and always had something positive to say. When someone would ask him how he was doing, he would reply, “If I were any better, I would be twins!”

He was a unique manager because he had several waiters who had followed him around from restaurant to restaurant. The reason the waiters followed Jerry was because of his attitude. He was a natural motivator. If an employee was having a bad day, Jerry was there telling the employee how to look on the positive side of the situation.

Seeing this style really made me curious, so one day I went up to Jerry and asked him, “I don’t get it! You can’t be a positive person all of the time. How do you do it?” Jerry replied, “Each morning I wake up and say to myself, Jerry, you have two choices today. You can choose to be in a good mood or you can choose to be in a bad mood.’ I choose to be in a good mood. Each time something bad happens, I can choose to be a victim or I can choose to learn from it. I choose to learn from it. Every time someone comes to me complaining, I can choose to accept their complaining or I can point out the positive side of life. I choose the positive side of life.”

“Yeah, right, it’s not that easy,” I protested.

“Yes it is,” Jerry said. “Life is all about choices. When you cut away all the junk, every situation is a choice. You choose how you react to situations. You choose how people will affect your mood. You choose to be in a good mood or bad mood. The bottom line: It’s your choice how you live life.”

I reflected on what Jerry said. Soon thereafter, I left the restaurant industry to start my own business. We lost touch, but often thought about him when I made a choice about life instead of reacting to it. Several years later, I heard that Jerry did something you are never supposed to do in a restaurant business: he left the back door open one morning and was held up at gunpoint by three armed robbers. While trying to open the safe, his hand, shaking from nervousness, slipped off the combination. The robbers panicked and shot him. Luckily, Jerry was found relatively quickly and rushed to the local trauma center. After 18 hours of surgery and weeks of intensive care, Jerry was released from the hospital with fragments of the bullets still in his body. I saw Jerry about six months after the accident. When I asked him how he was, he replied, “If I were any better, I’d be twins. Wanna see my scars?”

I declined to see his wounds, but did ask him what had gone through his mind as the robbery took place. “The first thing that went through my mind was that I should have locked the back door,” Jerry replied. “Then, as I lay on the floor, I remembered that I had two choices: I could choose to live, or I could choose to die. I chose to live.”

“Weren’t you scared? Did you lose consciousness?” I asked. Jerry continued, “The paramedics were great. They kept telling me I was going to be fine. But when they wheeled me into the emergency room and I saw the expressions on the faces of the doctors and nurses, I got really scared. In their eyes, I read, ‘He’s a dead man.’ I knew I needed to take action.”

“What did you do?” I asked.

“Well, there was a big, burly nurse shouting questions at me,” said Jerry. “She asked if I was allergic to anything. ‘Yes,’ I replied. The doctors and nurses stopped working as they waited for my reply… I took a deep breath and yelled, ‘Bullets!’ Over their laughter, I told them, ‘I am choosing to live. Operate on me as if I am alive, not dead.”

Jerry lived thanks to the skill of his doctors, but also because of his amazing attitude. I learned from him that every day we have the choice to live fully. Attitude, after all, is everything.

Life.......Live it, Enjoy it, Celebrate it, and Fulfill it

This is how human brain changes when the status changed. Only few remember what life was before, and who’s always been there even in the most painful situations.
Life Is A Gift
Today before you think of saying an unkind word–
think of someone who can’t speak.
Before you complain about the taste of your food–
think of someone who has nothing to eat.
Before you complain about your husband or wife–
think of someone who is crying out to God for a companion.
Today before you complain about life–
think of someone who went too early to heaven.
Before you complain about your children–
think of someone who desires children but they’re barren.
Before you argue about your dirty house, someone didn’t clean or sweep–
think of the people who are living in the streets.
Before whining about the distance you drive–
think of someone who walks the same distance with their feet.
And when you are tired and complain about your job–
think of the unemployed, the disabled and those who wished they had your job.
But before you think of pointing the finger or condemning another–
remember that not one of us are without sin and we all answer to one maker.
And when depressing thoughts seem to get you down–
put a smile on your face and thank God you’re alive and still around.
Life is a gift – Live it, Enjoy it, Celebrate it, and Fulfill it.

Just take care of my eyes dear

There was a blind girl who hated herself just because she was blind. She hated everyone, except her loving boyfriend. He was always there for her. She said that if she could only see the world, she would marry her boyfriend.
One day, someone donated a pair of eyes to her and then she could see everything, including her boyfriend. Her boyfriend asked her, “now that you can see the world, will you marry me?”
The girl was shocked when she saw that her boyfriend was blind too, and refused to marry him. Her boyfriend walked away in tears, and later wrote a letter to her saying:
“Just take care of my eyes dear.”

Love..This is Love

Once upon a time all feelings and emotions went to a coastal island for a vacation. According to their nature, each was having a good time. Suddenly, a warning of an impending storm was announced and everyone was advised to evacuate the island.
The announcement caused sudden panic. All rushed to their boats. Even damaged boats were quickly repaired and commissioned for duty.
Yet, Love did not wish to flee quickly. There was so much to do. But as the clouds darkened, Love realized it was time to leave. Alas, there were no boats to spare. Love looked around with hope.
Just then Prosperity passed by in a luxurious boat. Love shouted, “Prosperity, could you please take me in your boat?”
“No,” replied Prosperity, “my boat is full of precious possessions, gold and silver. There is no place for you.”
A little later Vanity came by in a beautiful boat. Again Love shouted, “Could you help me, Vanity? I am stranded and need a lift. Please take me with you.”
Vanity responded haughtily, “No, I cannot take you with me. My boat will get soiled with your muddy feet.”
Sorrow passed by after some time. Again, Love asked for help. But it was to no avail. “No, I cannot take you with me. I am so sad. I want to be by myself.”
When Happiness passed by a few minutes later, Love again called for help. But Happiness was so happy that it did not look around, hardly concerned about anyone.
Love was growing restless and dejected. Just then somebody called out, “Come Love, I will take you with me.” Love did not know who was being so magnanimous, but jumped on to the boat, greatly relieved that she would reach a safe place.
On getting off the boat, Love met Knowledge. Puzzled, Love inquired, “Knowledge, do you know who so generously gave me a lift just when no one else wished to help?”
Knowledge smiled, “Oh, that was Time.”
“And why would Time stop to pick me and take me to safety?” Love wondered.
Knowledge smiled with deep wisdom and replied, “Because only Time knows your true greatness and what you are capable of. Only Love can bring peace and great happiness in this world.”
“The important message is that when we are prosperous, we overlook love. When we feel important, we forget love. Even in happiness and sorrow we forget love. Only with time do we realize the importance of love. Why wait that long? Why not make love a part of your life today?”

Monday, July 4, 2011

एक छोटीशी प्रेम कथा....

एक छोटीशी प्रेम कथा..

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते.  वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत.पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावी लातूरला
आणि हा कायमचा पुण्याला ..फोन वर बोलन तसे दररोजचेच.पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........

पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय.आणि माज्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...

तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...

वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवड्च म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे न्हवत...................तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो..त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जाणू नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले .मला माफ कर............................

..

ह्यांनी ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........)