Wednesday, May 8, 2013

कसला हा संसार..झालं बंद आता देवा कसला रं आधार .

कुठला रस्ता, कुठली वळणं


कसला हा अंधार .....
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार .....
कापरा वारा बेभानं
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटंवरती
दैवा चे बी वारं
झालं बंद आता देवा कसला रं आधार
चालून थकलं पाऊल आता
थांबतं मनात समधं काही
उन्हं उन्हं झालं झाड पाखराचं
सावली कुठचं  आज न्हाई
वणव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा
ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा
जगण्या मरणाचा अवतार
जल्माची सा-या संग कहाणी
तळाती तुटलेल्या रेषा
फिरत्यात सर नशिबाचं फेर


जगत्याची वणवणती भाषा
कळला न पिरतीचा अर्थ हा कुणा
हसण्यावर नसण्याचा सूड का पुन्हा
जगण्या मरणाचा अवतार 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...