Wednesday, May 8, 2013

लढा दिल्याशिवाय मागे हटू नकोस

Hey you, बाहेर थंडीत

एकटा पडत चाललेला, म्हातारा होत चाललेल्या
मी तुला जाणवतोय का?
Hey you, stop  वर उभा असलेल्या
प्राण गेलेले पाय आणि लुप्त होत चाललेलं हसू
मी तुला जाणवतोय का?
Hey you, प्रकाश विझवण्यात त्यांना मदत करू नकोस
लढा दिल्याशिवाय मागे हटू नकोस

Hey you, बाहेर एकट्याच्याच जीवावर असणाऱ्या
फोन जवळ नागवा बसलेल्या
मला स्पर्श करू शकतोस का?
Hey you, भिंतीला कान लावलेल्या
कोणीतरी बोलावेल याची वाट बघणाऱ्या
मला स्पर्श करू शकतोस का?
Hey you, मला दगड वाहायला मदत करशील का?
तुझ्या हृदयाची दारं उघड, मी घरी येतोय.

पण ही फक्त एक कल्पना होती


ती भिंत फार मोठी होती,
जी तुला दिसतंच आहे.
काही फरक नाही पडत त्यानी किती प्रयत्न केले,
तो मोकळा नाही होऊ शकत.
आणि त्याचा मेंदू किड्यांनी खाल्लाय.

Hey you, रस्त्यात उभ्या असलेल्या
नेहमी तेच करत असलेला जे तुला सांगितलंय,
तू मला मदत करशील का?
Hey you, बाहेर भिंतीच्या पलीकडे असलेल्या,
hall  मधे बाटल्या फोडत असलेल्या,
तू मला मदत करशील का?
Hey you, मला सांगू नकोस की काहीच आशा नाहीयेत
एकत्र जर लढू, आपण नक्कीच भिंत पाडू.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...