पाहण्या ग तुला , पापणी ही मिटे
नयन हे उघडताच, सांग गेली कुठे ?
दोन डोळ्यातली, दोन ओठान्तली
दोन श्वासातली, प्रीत गेली कुठे ?
आज का वाटतो कृष्ण हा एकटा
राधिका सांग तू आज गेली कुठे ?
मी जिला स्पर्शिले , उपवनी बहरली
रातरानी अशी , सांग गेली कुठे?
स्वप्न जे कालचे आज मी पाहतो
कालची शर्वरी , सांग गेली कुठे ?
दूर वाटेवरी, मी तुला पाहिले
वाट ती वेगली, सांग गेली कुठे
दूर तू, दूर मी, दूर एकांत हा !
सोडुनी या नभी, विज गेली कुठे ?
का "हरी" रे, अशी रित प्रेमातली ?
छेडूनी तार ती सांग गेली कुठे ?
- मनोज गोबे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...