हे ईश्वरा तुझ्या भक्ताचे
दुर्गुण गाऊ मी किती
कमी पडेल माझी मती
दुर्गुण गाता गाता
तुझा आवारात लोक
गाणी सिनेमाची लावतात
भजने याना भावतात
रिमिक्सचिच ...
कित्येकदा येथेच
चोर्यामोर्य होतात
दागदागिने जातात
चपलाही राहत नाही ..
खरा तो संत नामा
वालावंतात कीर्तन गाई
आता कीर्तनकार येत नाही
खीशे भरल्याशिवय....
तुला वाहिलेले श्रीफल
सांग कूटे जातो
पुजारी दुकानदार नाते
कायमचेच .....
दर्शनास अधुनमधुन
तरुण तुझ्या येतात
दर्शन मात्र घेतात
भलतेच ....
म्हणून आता पृथ्वीवर
जन्म नको घेऊ
अंतयात्रा नको पाहू
तुझीच तू ....
- मनोज गोबे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...