चांदने घेउन गेलीस तू
आयुष्य काळी रात्र आहे
प्राशुनी अंधार सारा
आजही मी गात आहे
तू दिलेले जहर सारे
भिनले जरी प्रानात आहे
वाटते तरी ही मला की
आज ही कैफात आहे
ही कशाची मज नशा ?
काय या व्यसनात आहे ?
तू दिलेले दू:ख ही
आजला बहरात आहे
नयनातल्या अश्रुतुनी
आटवांची बरसात आहे
तिपलेस तिपुर चांदने
तेज तुझ्या परसात आहे
वेदनेचे रोप माझ्या
वाढते ह्रदयात आहे
अन सुमनांची सेज
तुझ्या नशिबात आहे
तू माझी नव्हतीच कधीही
कळ ही काळजात आहे
जिव हा वेडापिसा अन
वेड़ाच हा आकांत आहे
- मनोज गोबे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...