या दुनियेच्या बाजारात
हसायचे राहुनच गेले
मागण्यात आयुष्य सारे
पद्पथावर हरवून गेले
पाहत आयुष्याची ही
तिथेच झाली
अपेक्षेच्या पदरी सदा
उपेक्षाच आली
आयुष्य सांधताना सारे
साखरे परी विरघलूंन गेले
हे दू:ख आसवाचे होते
पापन्याताच ते बंदिस्त झाले
आयुष सारे मी ओंजलित भरताना
सूखे अलगद गलुन गेली
दू:खाच्या थेम्बानिच
आयुष्याला साथ दिली
चालताना पुढे आता
परतीचे ठसे हरवले
ह्रुदयाचे हे गीत गायाचे
सारे अपुरेच राहिले
या बाजारात मानुस जोडताना
माझे सारे मानुसपन हरवून गेले
- मनोज गोबे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...