Friday, May 8, 2009

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा

सर्वानी याचा विचार करावा....!!!!!!!


कालचा मुंबईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंबई सर्वांची आहे " आसे विधान केले, अणि पुन्हा एकदा मराठी मानसास उपदेशाचे डोस पाजले. मला एक समजत नाही हा मुद्दा वारंवार का उकरून काढन्यात येत आहे ? नक्की याना काय दाखवून द्याचे आहे ? हल्ली कोणी उठतो व मुंबई कोणाची तिचावर कोणाचा हक्का आहे यावर प्रश्न निर्माण करत आहे. पण बंगाल मधे कोणी विचारत नाही कोलकाता कोणाचे आहे ? पंजाब मधे जावून विचारत नाही चंडीगड़ , अमृतसर कोनाच आहे ? गुजरात मधे जावून कोणी विचारत नाही सूरत कोणाचे आहे ? दक्षिनेतिल राज्यात जावून कोणी विचारत नाही चेन्नई कोणाचे ? बंगलौर कोणाचे ? अणि हैदराबाद कोणाचे ? पण महाराष्ट्रात मात्र विचारले जाते मुंबई कोणाची ? वरील कोणत्याही राज्यात जावून हा प्रश्न विचारण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही , व हिम्मत केलीतर त्याचा अंगावर कपडे राहणार नाहीत एवडी दहशत त्या त्या राज्यांची आहे. पण इथे मात्र कोणीही येवून पिचका-या मारत आहे. हें सर्व का व कशासाठी चाले आहे ?

खरेतर आता वेळ आहे एकजुट होवून या सर्वाना ठणकावून सांगण्याची की मुंबई देशाची काय जगाचीही असेल पण सर्व प्रथम ती आमचा महाराष्ट्राची राजधानी आहे. अणि तिचावर सर्व प्रथम कोणाचा हक्क असेल तर तो येथील मराठी माणसाचा आहे. जितक्या सहजतेने हें सांगत आहेत न की मुंबई सर्वांची आहे तितक्या सहजतेने मुंबई महाराष्ट्राला मिलालेली नाहीये तर तत्कालीन केंद्र सरकारशी लढून मिलावली आहे. मुंबई साठी १०५ मराठयानी आपले रक्त संदले आहे. आज मुम्बैची मलाई खाण्यास सर्वप्रांतीय नेते पुढे येत आहेत पण जेव्हा येथील मराठी मानुस मुंबई महाराष्ट्राला मिलाव्न्यसाठी संघर्ष करत होता आपले रक्त रस्त्यावर संदत होता तेव्हा अन्य प्रांतातील नेते मुग गिलून गप्पा बसले होते. तेव्हा मात्र कोणाला मुम्बैचा, इथल्या भूमिपुत्राचा हिताची पडली नव्हती. मग आता कोणत्या तोंडाने हें आपला हक्क येथे दाखवत आहेत ?

ज्या सोनिया गांधी यानि हा मुद्दा उपस्थित केला त्यांचा पतीचे आजोबा प. नेहरू यानि तर मुंबई महाराष्ट्राला मिलूचनये यासाठी मोठा प्रयत्न केला होता नाना दबावतंत्र त्यानी वापरले होते. आमचाच मराठी पोरांवर यानि गोळ्या चलाविल्या होत्या , यांचाच सरकारचा एक उद्दाम मंत्र्याने निवेदन द्यायला गेलेल्या आमचा पोरंवर गाड़ी चढवून त्यांचे प्राण घेतले होते.
विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमचा माता भगिनी वर यांचाच सरकारचा आदेशाने लाठी चालवून त्याना जायबंदी करण्यात आले होते. अहो एक सर्वात हेलाव्नारी घटना म्हणजे यांच्या आदेशाने होणार्या अंदाधुन्दा गोलिबारात एक १४/१५ वर्षाचे पोर ठार झाले होते , बाल्कनीत उभी असलेली आमची एक माता गोली लागुन ठार झाली होतीचाचा नेहारुना म्हणे लहान मुले आवडत. जापान भेटीत तेथील लहान मुलांचा मागणी वरून नेहारुनी त्याना एक हत्तीचे पिल्लू भेट दिले पण ह्याच चाचा नेहारुनी आमचा मुलांचा मग्निवर त्याना काय भेट दिले तर बंदुकीचा गोळ्या, आयुषभाराचे अपंगत्व, आई बाबांचा / नातेवैकानचा मृतदेह.
.अहो असे सांगन्य सारके बरेच आहे, सोनिया गांधीना हा इतिहास माहित नाही का ? व नसल्यास मग उगाच आपले थोबाड उच्कतू नये.

श्रीलंकेत तमिली वंशाचा लोकांवर होना-या अत्याचाराचा निषेध म्हनून तमिलनाडूत हिन्दुस्तांचा तिरंगा जलाल गेला त्यावर या सर्व दिड शहन्यानी आपले तोंड उघडले नाही, पण मराठी माणसाला उपदेशाचे डोस पाजन्यास मात्र हें सदैव तयार असतात.

मुंबई / महाराष्ट्राचा प्रगतित परप्रन्तियांचा वाटा आहे हें आणखी एक यांचे नेहमीचे तुन तुने असते , अरे हो आम्ही कुठे नाही म्हणतोय पण हें अर्ध सत्य आहे सत्य हें आहे की यांचा प्रगतित महाराष्ट्राचे योगदान आहे कारन महाराष्ट्राचे भले व्हावे व महाराष्ट्र प्रगतिशील व्हावा अश्या कोणत्याही उदात्त हेतूने सोशलवर्क करण्यासाठी ते येथे आले नाहीत.

पैसा कमाविने स्वताचा वैयतिक उत्कर्ष साधने हा त्यांचा प्रथम हेतु आहे. त्याना ही गोष्ट चांगलीच ठावुक आहे त्यांचा विकास त्यांचा कुतुम्बियाना सुरक्षित वातावरण येथेच मिळू शकते त्यासाठीच ते त्यांचे राज्य सोडून येथे येतात, ते जर एवडे कर्तुत्व वन आहेत तर त्यांचा राज्यात राहून त्यांचा राज्याचा विकास व प्रगति का करत नाही ? खरेतर ते स्वताचा विकास करत गेले अणि अप्रत्यक्षत राज्याचा विकास होत गेला. येथे मला मुद्दाम कोणाला विरोध करायचा नाही पण हें जो अमचावर उपकार करत आहेत असा आव अनतात त्यामागील सत्य हें आहे.

सर्व राज्यातील नेते आप आपल्या राज्यातील भाषिकंचे हित जप्न्यास प्राधान्य देतात, अणि ते कुणाला गैर वाटत नाही पण मराठी माणसाने आवाज उठवला की याना मलमलायला लागते.

मुंबई बहुरंगी / बहुढंगी आहे, तिने सर्वाना सामावून घेतले आहे, सर्वाना रोजगार दिला आहे, सर्व प्रांतीय व धर्मीय लोग येथे गुण्य गोविंदाने रहत आहेत याचे प्रमुख कारन आहे येथील मराठी मानुस. त्याने अन्य प्रांतात जाशी इतर भाषिकन विरुधु जो दूजाभावः दाखविला जातो तसा संकुचित पाना न दाखविता नेहमीच सर्व समावेशक वृति स्वीकारली म्हनून. अणि याच चंगुलपानाचा गैर फ़ायदा ही लोक आहेत. मराठी माणसाचा हक्क नाकारत आहेत.

अनी आपले लाचार नेते ही अशावेळी गप्पा बसतात, स्वताचा स्वर्थासथी हें लोग दिल्ली पुढे गुडघे तेकवतात. का नाही त्यान ठंकावत की यापुढे आस खपून घेतले जाणार नाही. येथे गल्लीत मराठी मराठी करणारे तिकडे दिल्लीत गेल्यावर मात्र शेपुट आत घालून बसतात, तेव्हा त्याना राष्ट्रीय विचार सुचू लागतात अनी स्वताचा स्वार्थाचा विषय आला की त्याना मग मराठी पण आठवू लगते मराठी पंतप्रधान व्हावा आशा वल्गना करू लागतात, अरे यांचे स्वताचे मराठी मुलांसाठी योगदान काय आहे ?

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...