Monday, May 11, 2009

मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री".

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...