मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच
पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही
आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय
क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.
आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...