मन हे असच असतं,
सैरावैरा धावणारं,
फ़ुलपखरासारखे या फ़ुलावरुन त्या फ़ुलावर उडणारं.
शरिरातील सर्व अवयवांना स्वतःत गुंतवून ठेवणारं.
नेहमी सर्व विचारांना एकमेकात गुरफ़टणारं.
मन हे असच असतं,
काबूत न राहणारं,
जमिनीपासुन् आकशापर्यंत स्वछंद फ़िरणारं.
कुणावर् हे बसले की डोळ्यांचा सूड घेणारं.
अंत नाहि, सीमा नाही अश्या गोष्टिता दडणारं.
सुःख कोठे भेटते का?, नेहमी हेच शोधणारं.
मन हे असच असतं,
याची शेंडि त्याला लाव, त्याची शेंडि याला, शांत राहणे जमत नाही.
विचार करुन् करुन् कधिहि थकत नाही.
याला आहे एकच उपाय....
मना सोबत भांडू नको.
मना माघे धावू नको.
मनाचा प्रवास संपणार नाही,
त्रास करुण् घेवु नको.
सर्वांनी या मनाशी असहकार करु या,
मन हे असचं असतं,
आपण यावर मात करुया...
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...