Monday, May 11, 2009

निर्धार

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हवं

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...