नाती तुटतात...
नाती जुडतात...
भावनांचे हे कसले धागे..
आपल्या बंधनानी नाती बांधतात...
नाते निनावी असते..
नात्याला नाव असते..
जी नाती अटूट असतात.
त्या नात्यांना नाव का नसते..
नकळतच अनोळखी व्यक्ती..
आपलेसे होऊन जातात..
या नात्याला काय नाव द्याल
मग बांधलेली नाती का तूटतात...
का नसतो नात्यांचा काळ...
का नसते नात्यांचे वय...
असतं ते फक्त अटूट नाते..
जे आपल्या नकळतच कधी-कधी...
आपल्याकडूनच निभावले जाते...
असेच असते का हे अटूट नाते ...?
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...