तारुण्य आणि वळणा-वळणाचा सुन्दर घाट यांच एकमेकांशी एक प्रतीकात्मक नात असाव..
गाडी जेव्हा नुकतीच घाटात प्रवेश करते तेव्हा समोर दिसतो भला मोठा डोंगर..
तो कसा पार होइल याची असणारी थोडीशी भीती...
त्या भीतीला पायाशी घेउन चालू लागणारा आत्मविश्वास...
आणि मग सुरु होतो अपरिचित वाटेवरचा अनोखा प्रवास...
धोक्याचा इशारा देणारे वळण...
खोल दरी आणि उंच पर्वत यात जगण्याचा वेग आणि तोल सांभाळत चालण्याची कसरत...
तारुण्य तरी दुसर काय असते...
बालपण संपल्याची बोच... नव्या दिशांची ओढ़..
मग सुरु होणारा नवाच हवाहवासा प्रवास...
तिथे सुद्धा वेग, वेळ आणि प्रेम यांच गणित साधूनच चालव लागते ना...!!
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...