प्रतिप्रसव.
----------------
पुन्हा पुम्हा मी हरवीत जावे,
पुन्हा पुन्हा तू जवळी यावे;
सात सुरांच्या संगीत राजा
सांग असे का सदा घडावे ?
तुझ्या विना जीव रमे न कोठे,
तरी विजनी का भरकट व्हावी ?
श्वासांमध्ये गंध तुझा, तरी
जाणीव असता नेणीव व्हावी ?
कळते, वळते, ना आकळते,
हसते, रूसते, मी ओघळते;
सात सुरांच्या संगीत राजा,
साद ऐकता धावत येते !
झुलव मला तू, भुलव मला तू,
स्वप्न-जागृती हसव मला तू;
जन्मजन्मीच्या नात्यामध्ये
असाच निशीदिन फ़ुलव मला तू ....
आणि अचानक एका जन्मी
दिव्य तेजसी बुडव मला तू;
नको कुशंका, तिमिर-ओढणी,
अद्वैतातच लपव मला तू !!
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...