Thursday, February 19, 2009

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे
----------------------------------------
--

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...