Saturday, January 16, 2010

लहरत गेले झाड धुक्यातून

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे

डोळ्यातील अश्रू पडतात

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

ठरवलं ना एकदा

ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं...

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी