Saturday, September 29, 2012

पण हल्ली मन थोड कठोर झालय : सध्याची वास्तवता


का कळत नाही, पण हल्ली मन थोड कठोर झालय .

प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय प्रेम, प्रेम, प्रेम, बस झाल आता . 

अरे एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार वारंवार का.

तिलाही माहिती आहे की ती माझी होऊ शकत नाही आणि मलाही माहिती आहे मी तिचा होऊ शकत नाही दोघांची गत अशी झालेली आहे. जस आल्वाच पान आंणि त्यावरचा थेंब , स्पर्श होऊ शकेल पण एक जीव उभ्या जन्मात नाही.
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कघीच पोहचाल्यत आणी तिच्या मनातल्या भावना माझ्या मनात पोहचल्यात. दोघांच्या भावनेत प्रेम आहे हे दोघनाही माहिती आहे. पण या भावना स्पष्ट का होत नाहीत . नाही ते कघीच होणार नाही ,त्या मागे एकच कारण असाव दोघांनाही एकच बंधनाने जखडून ठेवलय ……..संस्कार .
माझ्या लाडलीला लहानाच मोठ केले ,पोरीने जे मागीतल ते बापान पुरावल , पण शेवटी काय माजी पोरगी पलुन गेली . रस्त्यानी जाताना बायकांची होणारी ती कुजबुज ही बघ हीच पोरगी पलुन गेली त्या दिवशी अशा यातनेने माझ्या मायेच्या कालजाला चीरा पडू नयेत म्हणुन ...
पोराला लहानाचा मोठा केला , स्वतः फाटकी गंजी घातली पण पोराच्या कपड्याची इस्त्री कधी चुकवली नाही .
अरे काय नाही केल माझ्या बापान माझ्यासाठी स्वतःच्या पोठाची खलगी केली , पण मला या लेकाला computer engeeniner बनवल , बापान एकच मगितल माझ्याकडे पोरा आपल्या जातिचीच पोरगी कर हा लेका .आयुष्यात एकच गोष्ट मागितली बापान आनी मी तीही पूर्ण करू नये.
खरच संस्कार म्हणजे बंघन ………….नाही 
संस्कृती जपण्यासाठी दोन जिवांचा लागलेला लअला म्हणजे संस्कार आनी मग या लळ्या पुढे बाकी सर्वच गोष्ठी स्वः आणि मग आम्ही म्हणतो आमच्या नशिबात प्रेमच नाही

"खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

लग्न हे तसं  प्रत्येकाच्याच पाचवीला  पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.  
 

या जगात परफेक्ट  असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.  


आपल्या मनासारखीच  समोरची व्यक्ती हवी असा  अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका. 


लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा  मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही " 


मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.  


मुलाच्या किंवा  मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती  दिसायला तशीच असेन असा  ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.  


मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.  


हिच्यापेक्षा  ही जास्त चांगली वाटते  किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.  


असं म्हणतात  की मुलीच्या आई वरुन मुलगी  कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! ) 


पाहण्याच्या कार्यक्रमात  आपल्या बरोबर जे लोक असतात  त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.  


लग्नाला उभ्या  राहिलेल्या सगळ्यांच्या  मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?  


मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.

मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच. 

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन. 



कुठे तुला दिसतो

आज पौर्णिमेच्या रात्रीत
जा जरा चांदण्यात जा
बघ त्या पांढऱ्याशुभ्र रंगात
मी कुठे तुला दिसतो का

ह्या मोहक रात्रीत
जा जरा काजव्याच्या संगतीन जा
बघ त्या लुकलुकत्या आठवणीत
मी कुठे तुला दिसतो का

ह्या बहरलेल्या रात्रीत
जा जरा सुवाषिक बागेत जा
बघ त्या दरवळेल्या गंधात
मी कुठे तुला दिसतो का

ह्या सुंदर स्वप्नाच्या रात्रीत
जा जरा कल्पनेच्या सागरात जा
बघ त्या परीकथेच्या राजकुमारात
मी कुठे तुला दिसतो का

ह्या निर्मळ चंदेरी रात्रीत
जा जरा तुझ्या मनात जा
बघ ह्रदयाच्या काना-कोपऱ्यात
मी कुठे तुला दिसतो का 

ही कविता तिचीच आठवण करते आहे..

दिसलो कसाही पण आतुन खचलेलो आहे
वाट चालत आलोय एकल्याची 
आजही एकटाच आहे

गाव माझे मागे सोडुन
नवे आयुष्य जगतो आहे

थोडं हसतो आहे
थोडं रडतो आहे
स्वप्न ठेचाललेले उराशीच ठेवले आहे

आकाशाच्या रंगात तिला पाहणे

चंद्रामध्ये तिला पाहणे

वेडयासारखेच आता हे जगणे आहे
ती माझी नसतानाही माझी च म्हणतो आहे..

बात माझी वेगळीच आहे

दु:खांना माझ्या कवितेत माळतो आहे

आसवांच्या शाईने कविता मी लिहतो आहे
तिला कळत नाही 

ही कविता तिचीच आठवण करते आहे..

माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय ....,

 माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय  ....,

मला पण  i lv u म्हणायचं....
कुणाला तरी आठवणीत साठवायचं ...
प्रेमाचे  msg पाठवायचेत ...
मला पण रात्र रात्र बोलायचं
 माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय  ....,

कधी ग येणार तू जीवनात माझ्या..

माझे पण तुझ्यावर प्रेम आहे... असे सांगायचं  ..
तुझा राग आलाय करत उगाच भांडायचं 
तू  जवळ नसताना  आठवणीत झुरायचं  ..
" माझी सानुली " म्हणून तुला मनवायच ..

खूप स्वप्न बांधली उराशी
हव्या नाजूक भावना तुझ्या
श्वास श्वास मोजतो आहे
कधी ग येणार तू जीवनात माझ्या.

तुझ्या डोळ्यांतले पाणी माझ्यासाठी वाहेल

येईल अशी एक  वेळ

माझ्या प्रेमाची जाणीव तुला होईल

मला  भेटण्यासाठी मग तूझ्या नजराही आतुर होईल

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे 

आज  वेळ आहे बघ  वाटेवर  तुझ्या मी उभा आहे

अश्याच  एक  दिवशी   तू  उभी  राहशील  पण

उशीर झाला  असेल तेव्हा  मला तू थीरडी वर पाहशील 

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे 

तेव्हा  तुला जाणीव  होईल  माझ्या खरया प्रेमाची 

जाणीव  होईल माझ्या एकटे राहण्याची  

मग  तू  माझ्या मागे  येशील ही मला हाक  देत तू तेव्हा रडशील ही

पण  मी गेलो असेल 

माझीही इच्छा  होईल तेव्हा तुला भेटण्याची पण ...??

जीव माझा  कुणाच्या तरी हातात असेल  म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे

काही  दिवस  जातील मग तुझे लग्न होईल...

खुश  अशील तेव्हा  त्या  तुझ्या संसारात.. 

पण माझ्या नसण्याची  जाणीव   सतत  तुला जाणवेल 

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे 

दुसर्याच्या मिठीत असताना ..

जेव्हा  तुझ्या  डोळ्यांतले पाणी  माझ्यासाठी  वाहेल 

तेव्हा  तुला जाणीव  होईल  माझ्या खरया प्रेमाची  म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे.

एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती...

काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !

एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !!!!! 

आतां फक्त आठवणीवर उरले जीवन जगायचे..

जीवन जगतो तुझ्याविन  एकला एकाकी दुःखात
रात्र परि उडून जाते स्वप्नीं तुला पाहण्यात । 
श्वासासंगे आठवण येते  तुझ्या हृदय स्पंदनाची
हळूंवार ही झुळूक संगे  तुझ्या कोमल स्पर्शाची ।
कंठातून ते शब्द निघतां  नांव तुझे ओठीं येते
कानीं अन स्वर ते पडतां  तूं मारली हांक ऐकू येते ।
वेळी अवेळी भास होतो  तुझ्या प्रेमळ सान्निध्याचा
आवरतो न मोह मजला  कवटाळून तुज घेण्याचा ।
अचानक उठतो हात माझा  हांत तुझा धरण्यासाठी
आतुरतेने अन मन माझे  तुझ्या मादक स्पर्शासाठी ।
राहतो परि हात नुसता  हवेंत तो वरच्या वरती
अनामिक अन दडपण  येते  दुखावल्या मम मनावरती ।
क्षणांत आठवते  माझे मला  साथ सोडली तू अचानक
आणि घालवितो पुढचे  दुःखांत क्षण एक एक ।
आतां फक्त आठवणीवर  उरले जीवन जगायचे
अन एकाकी जगून  मातीत मिळून जायचे  ।। 

आधी नाही म्हणायचं आणि दुसऱ्यांना दुखवायचं...

आधी नाही म्हणायचं आणि दुसऱ्यांना दुखवायचं...
मग स्वतालाच त्रास सहन करून परत त्यांना खुश करण्यासाठी होय म्हणायचं...
सदैव दुसरयाचाच विचार करायचं, आपल्याला किती ताप झाला तरी चेहरा नेहमी हसरा ठेवायचा प्रयत्न करायचं...
माझे हे असंच असायचं......

लोक नेहमी म्हणतात तू हा असाच राहणार तुझ्यात कधी बदल नाही होणार, यावर  मी फक्त हसायचं...
जरी हसायचा तरी मनात काय आहे हे फक्त माझा मलाच ठाऊक  असायचं...
बोललो तर पुन्हा कोणीतरी नाराज होईल म्हणून गप्पच बसायचं...
माझे हे असंच असायचं......

मी नेहमी दुसऱ्या साठी झटतो हेच एक सुखद मोल लक्षात आणायचं, काही म्हणो जग आपण हे काम अविरत चालू ठेवायचं...
घरातील काही म्हणोत पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगायचं मग घरच्यांचा  विचार करायचं...
माझे हे असंच असायचं......

दुसऱ्यांना जगवले पण स्वत आणि कुटुंबाकडे लक्ष कुठे दिले हे कधी कधी लक्षात यायचं...
पण कोणीतरी हात सैल सोडावेत मग आपण का नाही म्हणून पुन्हा अविरत राबायचं...
हाहा  म्हणता आयुष्य असाच सारायचा दुसऱ्यासाठी राबता राबता एक दिवस दुसरयासाठीच मरायचं ..

क्षण कधीच आपले नसतात...


क्षण कधीच आपले नसतात, ते असतात निष्ठूर
गुंतवतात आपल्या मनाला अन निघून जातात दूर
 क्षण कधीच आपले नसतात...
क्षण कधीच आपले नसतात, ते असतात मग्रूर
क्षणातल्या जीवनाला, जीवनातला क्षण बनवून
भिरकावून देतात दूर,
क्षण कधीच आपले नसतात....
क्षण कधीच आपले नसतात, तेच असतात क्षणभंगुर
फुलपाखरांसारखे  बोटांवर रंग ठेऊन निघून जातात दूर
क्षण कधीच आपले नसतात...

खरच, अगदी कुठलाही क्षण , 'आता मी येतोय' असे सांगून येत नाही. अन जेव्हा तो निघून जातो तेव्हाच तो आपल्याजवळ  होता ये लक्षात येते . पण काय करणार तोपर्यंत तो निघून गेला असतो खूप दूर 
कधीही परत न येण्यासाठी..!
नाही म्हणायला, काही क्षण आपल्याजवळ परत येतात आठवणी घेऊन. पितरांची आठवण व्हावी म्हणून आपण श्राद्ध घालतो ना , तसेच हे परत येणारे क्षणही त्या 'कोणे एके वेळी' जगलेल्या क्षणाची आठवण करून देण्यासाठी जणू श्राद्ध घालायलाच येतात. 
येणारा क्षण हा मुळी परतीचे तिकीट काढूनच येतो. मुठीत धरलेली वाळू ज्या प्रमाणे कणाकणाने निसटते अगदी असेच क्षणांचे होते. थोर लेखक व पु काळे या फसव्या क्षणांबद्दल म्हणतात  - " सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? आठवणी या कधीच सुखद नसतात . मग त्या दुखाच्या असोत व सुखाच्या. दुखाच्या असतील तर त्या पायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो  अन त्या आठवणी जर सुखाच्या असतील तर ते सुखद क्षण 'निसटले' म्हणून त्रास!"  वपुंचे हे शब्द माझ्या म्हणण्याला कितीतरी बळ  देऊन जातात.
काय गम्मत आहे बघा आपल्याला हवा तो क्षण यायला सुद्धा मध्ये काही क्षणच जाऊ द्यावे लागतात. 
क्षणांच्या तोलामोलाचे दस्तुरखुद्द क्षणाच असतात.
क्षण हे झरयातल्या पाण्या सारखे असतात सतत प्रवाही ! येणारा प्रत्येक क्षण निर्मल व अस्पर्शित ! बोला या क्षणात काय करणार असा बाळबोध प्रश्न घेऊनच जणू प्रत्येक क्षण येत असतो. मात्र आपण कपाळ करंटे , येणाऱ्या क्षणाटली कोवळीक व आगळीक आपण ओळखूच शकत नाही.
खरे तर येणारा प्रत्येक क्षण हा संस्कारक्षम अंकुर घेऊन येत असतो, त्या क्षणात नवनिर्मितीची बीजे ठासून भरलेली असतात. गरज असते ती हे कोवळे अंकुर जगवण्याची. या संदर्भात लेखक प्रवीण दवणे  यांचे विचार मार्गदर्शक ठरावेत. ते म्हणतात ---
" कधी कधी उगाचच निर्माण केलेल्या वैतागाने त्या त्या वेळी बिलगु पाहणारे कोवळे क्षण रुसून माघारी निघून जातात अन त्याचेच खरे प्रश्न जोतात. उगवतील न उगवतील माहित नसत पण आपण आनंदाच्या बिया पेरीत राहावं. क्षणही कुठेतरी 'भिजत' पडलेला असतोच तो रुजून येण्याची त्याची त्याची एक वेळ असते. आपण मस्तपैकी आनंदाच्या बिया पेरीत रहाव्या !"
त्यामुळे शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की फार उमेदीने येणाऱ्या 'भविष्यातील' क्षणाला, 'वर्तमानातील' आपल्या 'स्वागतोत्सुक' मनाने  आपण अविस्मरणीय असा 'भूतकाळ' निश्चितच देऊ शकतो.  
तर मग चला,  
नवकल्पनांचे स्फुल्लिंग हाताशी धरून येणाऱ्या क्षणांना साद घालूया, 
अगदी 'आतून' आणि जीव ओतून . 
मग क्षणही असेलच तिथे  शिंपल्यातील मोत्याप्रमाणे  आपल्या मनाचा कप्पा व्यापून घेण्यासाठी टपून बसलेला !

काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...?

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
  तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
   

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
  ती कायमची निघुन गेली...
   

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
  दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'


या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती. 

.एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या.. 

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
  "..पाहतो आणि कोसळतोच.."
   

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
  हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
   

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली.. 
..
.
  
तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...

‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता! ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!

असे ही नवरे   
मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से गोळा करावेत. त्या ‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता! ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो. बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो- ‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''
२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
‘‘तू दिवसभर करतेस तरी काय?’’- तो पत्नीस फटकारतो. बायको हुशार. ती म्हणते- ‘‘त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!’’
३) रंगेल नवरा- संशयी बायको
एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते- ``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?’’
मॅनेजर- ‘‘आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ‘‘दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!’’
४)Hen pecked नवरा-
एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण संपवावे म्हणून नवरा ‘बरं! राहील!!’ असं म्हणून आपले ‘स्थान’ ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?’’- 
५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ‘‘तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?’’
६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा-
प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्‍‌र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ‘‘असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!'' :)

मी आता माझ्या राज्याकडे चालली आहे...

आजकाल ती जरा विचित्रच वागत होती. सर्वांपासून अलिप्त रहायची. कोणाशी जास्त काही बोलायची हि नाही. ती सोडून तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांना म्हणजेच तिचे ममी, पपा, तिचे मित्र-मैत्रिणीं यांना तिच्या वागणूकीतला हा फरक जाणवत होता, पण तिला नक्की काय झालंय हे कोणालाच काही कळत नव्हतं.

पण ती... तिच्या मते तिचे आता सुरवंटातून फुलपाखरात रुपांतर झाले होते. कारण हि तसेच होते. कालच तिचे त्याच्याबरोबर लग्न झाले होते आणि रात्री तिला भरपूर सुख देवून सकाळी तो नेहमीप्रमाणे कुठेतरी गायब झाला होता. पण तिला ह्यावेळी त्याच्या निघून जाण्याचे काहीच वाटत नव्हते. कारण रात्री परत भेटण्याचे वचन देवूनच तो निघून गेला होता आणि तिला हवे त्यावेळी तर तो तिच्या जवळच असायचा. डोळे बंद केल्यावर तिला त्याचं अस्तित्व जाणवत रहायचं.

आज रात्री हि तो ठरल्याप्रमाणे आला होता आणि त्याने तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. 
तिने लाडात येवून विचारले, “आज इतका उशिर का केलास यायला?”
उशिर कुठे गं! रोजच्या प्रमाणेच तर आलोय. उलट केव्हापासून तुझ्याच येण्याची वाट बघत होतो मी. तिने प्रेमाने त्याला आलिंगन दिले. त्याच्या केसातून हात फिरवत तिने विचारले, “आपण अजून किती दिवस असे चोरून भेटायचं?”
मग आता आणखी काय करुया तूच सांग. काल लग्नाचा हट्ट केलास म्हणून तुझी ती हि इच्छा पूर्ण केली. आता अजून काय करू मी शोना?
“तूला कळत कसे नाही रे! मला आता भासाच्या जगात राहायचा कंटाळा आलाय रे. मला साऱ्या जगाला ओरडून सांगायचंय आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता तर आपलं लग्न हि झालंय ना मग आतातरी सर्वांसमोर येऊन मला स्विकार ना रे, असं रोज फक्त रात्रीच किती दिवस भेटायचं आपण? मला तू कायमचा हवा आहेस माझ्याजवळ” त्याच्या डोळ्यात बघत ती बोलत होती.
होय रे शोना, पण मी तरी काय करू ऑफिसमध्ये इतकं काम असतं, सध्या खूप बिझी आहे गं. पण कधी तरी तुझ्या आई-बाबांना येवून नक्की भेटेन हं. आता खूप थकलोय गं मी! मला तुझ्या कुशीत घे ना, असे म्हणून तो तिच्या कुशीत शिरला हि.

सकाळ झाली होती. तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला पहिले. तो अजून साखरझोपेतच होता. त्याला उठवत त्याच्या केसातून हात फिरवत तिने विचारले, “मी जावू का रे? मला ऑफिसला जायला उशिर होतोय! तू हि उठ ना आता तुला हि निघायचं असेल ना.
थांब नं शोना. मला सोडून जावू नकोस ना प्लीज. 
असं रे काय करतोस, उठ ना रे मला उशिर होतो मग ऑफिसला पोहचायला, जावू देत ना प्लीजजजजजज...
मिठीतून तिला सोडवतच त्याने विचारले, “रात्री लवकर येशील ना?”
“हो रे माझ्या राज्या” असे म्हणून त्याच्या कपाळावर एक चुंबन देवून ती निघून गेली.

जवळ जवळ एक वर्ष आधिच दोघांची हि एका सोशल साईट वर ओळख झाली होती. तिथेच तिने त्याचा फोटो हि पहिला होता. प्रत्यकक्षात एकमेकांना न बघता, न भेटताही फक्त चाट वर आणि फोन वर बोलता बोलता एक दिवस त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. 

तो रोज रात्री तिला फोन करत असे. ती हि त्याच्याबरोबर बराच वेळ मध्यरात्र उलटेपर्यंत बोलत बसायची. तिच्या ममी पपांना ह्याबद्दल काहीच कल्पना नसायची. असणार तरी कशी म्हणा! एकुलती एक अपत्य असल्याकारणाने तिच्या पपांनी तिला स्वतंत्र बेडरूम दिली होती आणि ती हि कोणाला काही कळू नये याची पुरेपूर काळजी घेत होती. खरे तर तिला तिच्या ममी पपांना त्याच्याबद्दल सगळे काही सांगून टाकायचे होते, पण त्यानेच तिला “अजून इतक्यात कोणाला काही सांगू नकोस” असे बजावून ठेवले होते. आपण आधी प्रत्यकक्षात भेटू या आणि मगच योग्य वेळ आली की सगळ्यांना सांगूया असे त्याचे मत होते. म्हणून तिने हि मग ते गुपित स्वत:च्या मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवले होते. 

तिच्यासाठी हे सारे नविन होते. तिच्या मते तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला अखेर सापडला होता. आता त्याला प्रत्यकक्षात भेटण्याची ओढ तिला लागली होती. तिने त्याला त्याबद्दल बरेचदा विचारले हि होते. पण तो खूपच बिझी असल्याचे कारण तिला सतत देत राहायचा. 

माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं तिला सारखं वाटत राहायचं. SMS आणि फोनद्वारे ती त्याच्यावरचे आपले प्रेम सतत व्यक्त हि करत राहायची आणि तो... त्याच्या मनात तर काही भलतेच शिजत होते. खरे तर त्याच्यासाठी ती फक्त एक टाईमपास होती, just a TP... म्हणूनच बहुतेक तो तिला भेटण्याचे टाळत होता. हो नाही तर उगीच उद्या गळ्यात पडायची लग्न करच म्हणून. पण ह्या गोष्टीचे तिला भान नव्हते. ती त्याच्या प्रेमात पुर्णपणे आंधळी झाली होती. स्वप्नांत त्याच्याबरोबर रमू लागली होती. त्याच्याबरोबर चोरून भेटी गाठी, प्रेमळ क्षण सारे काही ती प्रत्यकक्षात अनुभवता येत नसल्यामुळे स्वप्नांत अनुभवत होती.  

असेच दिवस जात होते ती पुर्णपणे त्याच्यात गुंतत चालली होती. पण तो मात्र आता बदलला होता. त्याला आता तिचा कंटाळा येवू लागला होता. बहुतेक आता तो नविन टाईमपासच्या शोधात होता. त्याने स्वत:हून तिला फोन करणं तर बंद केलंच होतं, पण तिचा फोन हि आता तो टाळू लागला होता. “मी सध्या कामात आहे तुला नंतर फोन करतो शोना” अशी कारणं देवून तो फोन ठेवत असे. ती बिचारी दिवस-रात्र त्याच्याच फोनची वाट बघत उदास व्हायची. रात्री स्वप्नांत तो भेटल्यावर त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. तुझं वागणं मला आजकाल अजिबात आवडत नाही. काय झालंय तुला सांग ना? असा का वागतोस हल्ली माझ्याशी? इतका काय बिझी आहेस की माझ्याशी बोलायला तुझ्याजवळ एक मिनिट हि नाही. मग नेहमीप्रमाणे स्वप्नांत तो तिची समजूत काढायचा. माझ्या शोना असं काय करतेस. अगं खरंच आजकाल कामात खूप बिझी झालोय गं मी. तुला फोन करायला खरं तर अजिबातच वेळ मिळत नाही, तुझी शप्पथ! असे म्हणून तिला आपल्या मिठीत ओढून घ्यायचा. हल्ली तिचं त्याच्याशी बरचसं बोलणं फक्त स्वप्नातच व्हायचं. त्यामुळे बरेच दिवस दोघांचा एकमेकांशी काही contact नसला तरी तिला तो तिच्यापासून दूर जाणवतच नसे. डोळे बंद केले की तो तिच्या आजूबाजूलाच कुठेतरी असल्याचा भास तिला सारखा होत असे.

कधी तरी त्याच्याशी प्रत्यकक्षात बोलण्याची उर्मी तिच्या मनात दाटून येत असे आणि अखेर न राहवून तीच त्याला फोन करत असे. पण त्याचे उत्तर ठरलेले असे, “कामात खूप बिझी आहे तुला नंतर कॉल करतो”. ती हि मग स्वत:वरच आणि त्याच्यावरही नाराज होत असे त्याला फोन केल्याबद्दल आणि त्याच्याकडून अपेक्षित उत्तर आल्याबद्दल. पण रात्री पुन्हा तेच घडत असे, स्वप्नांत येवून आपल्या गोड बोलण्याने तो तिचा सारा राग दूर करत असे आणि प्रेमाने तिला जवळ घेत असे. 

पण तिने आता ठरवलेच होते, जोपर्यंत तो स्वत: फोन करत नाही तो पर्यंत त्याला फोन करायचा नाही आणि प्रत्यकक्षात भेटण्याबद्दल हि कधीच काहीच बोलायचं नाही. 

दिवसांमागून दिवस जात होते. जवळ जवळ सहा महिने झाले होते. त्याचा फोन किंवा साधा sms  हि आला नव्हता आणि तिने हि कधी केला नव्हता. पण तिला ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. रात्री स्वप्नांत येवून तो तिला दिवसभरातले सारे प्रेम देवून जायचा. तिच्याशी गप्पा मारायचा. तो आपल्याला कायमचा सोडून गेलाय हे तिच्या बुद्धीने मान्य केले होते पण तिचे मन अजून हि मानायला तयार नव्हते. ते दिवसेंदिवस त्याच्यात अधिकच गुंतत चालले होते. त्याच्या विचारातून बाहेर पडायला ते तयारच नव्हते. तिने डोळे बंद केले की तिला तो आसपास जाणवत रहायचा. तिने त्याला अजूनपर्यंत प्रत्यकक्षात कधी पहिले नव्हते पण त्याचा फोटो पहिला होता. फोटोतला तो आणि फोनवरचा त्याचा आवाज ऐकून स्वप्नांत त्याच्याबद्दल एक प्रतिमा तिच्या मनात तयार झाली होती. ती आता त्याच्या त्या प्रतिमेवरच प्रेम करू लागली होती. तिच्या इच्छा ती स्वप्नांत त्याच्याजवळ व्यक्त करायची आणि तो हि त्या पूर्ण करायचा.  स्वप्नातल्या त्याच्यामुळे ती आता प्रत्यकक्षातल्या त्याला जणू काही विसरूनच गेली होती आणि भासाच्या एका नवीनच जगात रममाण झाली होती.

आज जवळ जवळ दोन वर्षे पूर्ण झाली होती त्याला तिच्या आयुष्यातून निघून जावून, पण ती ... ती अजून हि तिच्याच स्वप्नांतल्या विश्वात रमली होती. त्याच्याबरोबर तिचा संसार हि सुरु झाला होता आणि आजच तिने त्याला एक गोड बातमी हि दिली होती. ती आई होणार असल्याची. तो खूप खुष झाला होता. आनंदाने त्याने तिला मिठीच मारली होती. 
ये सांग ना आपलं बाळ कोणासारखं दिसेल गं? 
तुझ्यासारखं... ती लाजतच म्हणाली.
नाही हं... मला तुझ्यासारखं हवंय. 

आजकाल तिची तो खूप काळजी घेत होता. तिला काय हवे काय नको ते सारे पहात होता. पाहता पाहता नऊ महिने निघून गेले आणि अखेर तो दिवस उजाडला ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. तिला असह्य प्रसुतीवेदना सुरु झाल्या. तो तिच्या जवळच बसून होता. तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी! त्यांचा सांभाळ करता करता दोघांच्या नाकी नऊ येत असे. पण दोघंही एकमेकांना सांभाळून घेत होती. त्याच्यासोबत ती खूप खुश होती. 

दिवसेंदिवस तिचा हा मानसिक आजार वाढतच चालला होता, पण तिच्या ममी पपांना अजून तिच्या आजाराबद्दल काहीच कल्पना आली नव्हती. की बहुधा आपल्या मुलीला स्किझोफ्रेनिया असा काही एखादा आजार होवू शकतो असा विचार हि कधी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. तिचे अबोल आणि एकटीच राहणे त्यांना खटकतही होते, पण त्याबद्दलचे कारण काही केल्या त्यांना कळत नव्हते. तिच्या मनाचा थांगपत्ता तिने कोणालाच लागू दिला नव्हता. 

त्यादिवशी रात्री जेवताना पपांनी तिच्याजवळ विषय काढलाच. राणी आजकाल अशी अबोल का झाली आहेस तू? कसली चिंता आहे का तुला? कुणा मुलाच्या प्रेमात बिमात पडलीस नाहीस ना बेटा?
“काय हो पपा”! असे म्हणून ती लाजलीच.
बघ कुणी असेल तर सांग. तुमचं लग्न लावून देवू आम्ही, त्याबद्दल काळजी नको करूस बेटा!
पपा कुणी असेल तर मी तुम्हांला आणि ममाला सर्वात आधी येवून सांगेनच ना!
अच्छा कुणी नाही म्हणजे तर?
हो नाही! असे म्हणत तिने जीभ चावली.
अग मग तुला तो राहुल कसा वाटतो?
कोण राहुल पपा?
अग विसरलीस माझा मित्र दिनकर त्याचा मुलगा. लहानपणी तुम्ही दोघं एकत्रच खेळायचे नाही का.
त्याला काय झालं पपा?
काही झालं नाही पण तुला तो कसा वाटतो लग्नाच्या दृष्टीने? आजच दिन्याचा फोन आला होता. त्याने राहुलसाठी तुला मागणी घातली आहे.
काय हो पपा, मला इतक्यात लग्न नाही करायचंय.
पण का?
तुम्हां दोघांना सोडून मी कधीच कुठे जाणार नाही.
अग वेडे एक ना एक दिवस तर तुला जावेच लागेल ना तुझ्या सासरी.
“काहीही असो! मला इतक्यात लग्न नाही करायचंय” असे म्हणून ती जेवण अर्धवटच सोडून आपल्या रुममध्ये निघून गेली. 

रुममध्ये आल्यावर तिने डोळे बंद केले. त्याने मागूनच तिला मिठीत घेतले.
“सोड मला” तिने लटक्या रागातच म्हणटले.
अरे काय झालं? आज माझी शोना माझ्यावर खूपच रागावलेली दिसतेय.
हो!
का बरे?
तू ममी पपांना कधी भेटणार आहेस? 
भेटतो ना कधीतरी, काय एवढी घाई आहे शोना? असे म्हणत तो तिच्या केसातून हात फिरवू लागला.
तुला नसेल पण मला आहे. पपांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलंय.
अरे वाह! कोण? कुठला? काय करतो मुलगा?
आहे कुणी तरी राहुल म्हणून पपांच्या मित्राचा मुलगा. लहानपणी म्हणे आम्ही एकत्रच खेळायचो.
अग मग बघ ना! चांगलं स्थळ असेल तर लग्न करायला काय हरकत आहे. तू खरंच कर लग्न त्याच्याशी. 
हे तू म्हणतोयस? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला.  अरे मी त्याला पाहिलं हि नाही आहे कित्येक वर्षात आणि मला आता आठवत हि नाही तो कोण आणि कसा दिसतो ते. 
मला तरी अजून कुठे पाहिलंस आहेस तू शोना! तिची हनुवटी वर करत त्याने विचारले.
तुझी गोष्ट वेगळी आहे रे ... आणि तू विसरलास का? आपलं लग्न कधीच झालंय ते आणि आपल्या दोन पिल्लाचं काय? माझ्याशिवाय राहतील का रे ते?
जग नाही मानणार आपल्या लग्नाला शोना आणि बच्चू माझ्याजवळ राहतील गं. तू त्यांची आणि माझी अजिबात काळजी करू नकोस.
जग मानू देत अथवा नको पण माझ्यासाठी तूच माझा नवरा आहेस. त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.
हो रे शोना, पण मी हा असा ... फक्त तुझ्या स्वप्नातल्या जगात राहणारा. साऱ्या जगासमोर येवून तुला नाही स्विकारू शकत गं.
पण का?
ते मला विचारू नकोस ना प्लीज...
मग जा इथून कायमचा निघून.
खरंच जावू का?
हो!
बरं जातो मग मी, तू तुझी काळजी घे आणि पपा म्हणतील त्या मुलाशी लग्न कर आणि सुखी हो.
तो उठून जाणार इतक्यात तिने त्याचा हात धरला आणि त्याला विनवू लागली, “नको ना जावूस प्लीज. तुझ्या शिवाय मी नाही जगू शकत रे!”
अग वेडे मी तुझ्या जवळच आहे बघ. तू जेव्हा मला बोलावशील मी तुझ्यासमोर लगेच हजर होईन. 
पण मला तू कायमचा हवा आहेस रे, फक्त माझा म्हणून आणि माझ्या सोबत. 
मला हि तू हवी आहेस शोना!
मग मी काय करू तूच सांग ना रे?
एक करू शकतेस ... आयुष्यभरासाठी कायमचे डोळे बंद करून, तुला तुझे जग सोडून, माझ्यासोबत माझ्या स्वप्नांच्या दुनियेत यावे लागेल, बोल आहेस का तयार?
हो आहे तयार. माझ्यासाठी तर तूच माझे जग आहेस! तू माझी परीक्षा घेतो आहेस का रे?
नाही गं वेडे, मी फक्त तुझी मस्करी करत होतो.
पण मी सध्या मस्करीच्या मुड मध्ये अजिबात नाही.
अच्छा! मग सांग कधी येते आहेस माझ्याजवळ कायमची तुझ्या ममी पपांना सोडून?
लवकरच! असे म्हणून तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती जोर जोरात हुंदके देवून रडू लागली.

सकाळी ती अजून कशी उठली नाही म्हणून तिची मम्मी तिच्या रुममध्ये येवून तिला उठवू लागली. पण ती उशीला तो समजून स्वत:च्या कुशीत घेवून कायमची निघून गेली होती, तिच्या स्वप्नांतल्या जगात, त्याला भेटायला. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे घाबरून जावून तिच्या ममी ने तिच्या पपांना बोलावून आणले. अहो, बघा ना! हि उठत का नाही आहे? तिच्या पपांची नजर जवळच पडलेल्या बेगॉन स्प्रेच्या रिकाम्या बाटलीवर गेली. इतक्यात तिच्या ममाला तिच्या जवळच एक चिठ्ठी सापडली. 

प्रिय ममी पपा,

मी राहुल बरोबर लग्न नाही करू शकत. कारण मी आता माझ्या राज्याकडे चालली आहे. खरे तर आमचं लग्न केव्हाच झालंय आणि आम्हांला आता आमचे दोन बच्चू हि आहेत. इतके दिवस हि गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली त्याबद्दल मी तुमची माफी मागते. काही कारणांमुळे मी त्यांना तुमच्या समोर नाही आणू शकली, पण कधी ना कधी तुमची आणि त्यांची ओळख नक्की करून देईन. मला त्यांची आणि त्यांना माझी खूपच गरज आहे म्हणून मी त्यांच्या जवळ कायमची चालली आहे. माझी काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी घ्या.

तुमची मुलगी
राणी.