Friday, September 28, 2012

प्रेम करायचंच / नाही

असं म्हणतात कि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. पण तसं अजिबात नसत, मुळात प्रेम कधी खरं किवा खोटं नसतं. प्रेम हे नेहमीच खरं असतं मग ते पहिलं असो वा दुसरं. प्रेमात पडायला  मर्यादा नसतात. काही वेळा असं होतं कि आपण चूकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो कालांतराने लक्षात येतं कि समोरची व्यक्ती आपल्या अजिबात योग्यतेची नाही. पण डोक्यात काही चुकीच्या कल्पना रुजलेल्या असतात... पहिलं प्रेम, प्रेम फक्त एकदाच होत वगैरे वगैरे. मग या दडपणाखाली नको असलेल्या नात्याचा एकतर स्वीकार केला जातो ज्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात  किव्वा प्रेमभंगाच्या धक्क्याने काहीजण आत्मघात करायलाही पुढे मागे पहात नाहीत.
 
जर पहिले प्रेम यशस्वी नाही झाले तर पुन्हा प्रेम करायचंच नाही असं म्हणण चूकीचं आहे. चूका प्रत्तेक गोष्टीत होतात भाजी घेताना नाही का एखादा टोम्याटो बाहेरून खूप छान रसरशीत दिसतो पण आतून किडलेला असतो. तेव्हा आपण ती भाजी खाणं सोडून देतो का? जोडीदार निवडतानाहि चूक होऊ शकते. आयुष्य कधीही कोणासाठी थांबत नसतं. मग स्वताचा अमूल्य वेळ अयोग्य व्यक्तीच्या विचारात का घालवा? जे प्रेम यातना देतं ते मूळी प्रेम नसतच. त्यासाठी स्वताच नुकसान करून घेण हा निव्वळ मूर्खपणा आहे. जर पहिलं प्रेम तुम्हाला यातना देवून गेलय तर नक्कीच विचार करा दुसऱ्या प्रेमाचा पण डोळसपणे.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...