Saturday, September 29, 2012

आतां फक्त आठवणीवर उरले जीवन जगायचे..

जीवन जगतो तुझ्याविन  एकला एकाकी दुःखात
रात्र परि उडून जाते स्वप्नीं तुला पाहण्यात । 
श्वासासंगे आठवण येते  तुझ्या हृदय स्पंदनाची
हळूंवार ही झुळूक संगे  तुझ्या कोमल स्पर्शाची ।
कंठातून ते शब्द निघतां  नांव तुझे ओठीं येते
कानीं अन स्वर ते पडतां  तूं मारली हांक ऐकू येते ।
वेळी अवेळी भास होतो  तुझ्या प्रेमळ सान्निध्याचा
आवरतो न मोह मजला  कवटाळून तुज घेण्याचा ।
अचानक उठतो हात माझा  हांत तुझा धरण्यासाठी
आतुरतेने अन मन माझे  तुझ्या मादक स्पर्शासाठी ।
राहतो परि हात नुसता  हवेंत तो वरच्या वरती
अनामिक अन दडपण  येते  दुखावल्या मम मनावरती ।
क्षणांत आठवते  माझे मला  साथ सोडली तू अचानक
आणि घालवितो पुढचे  दुःखांत क्षण एक एक ।
आतां फक्त आठवणीवर  उरले जीवन जगायचे
अन एकाकी जगून  मातीत मिळून जायचे  ।। 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...