Tuesday, December 28, 2010

अपुरे स्वप्न.... २००५ - २०१० " सुस्वागतम " <---> २०११ <----->

" नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या"
२००५  -  २०१०  सुस्वागतम २०११

दुष्ट लागणा जोगे सारे गाल बोट हि कोटे नसे
जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्या पुढे  फिका पडे
स्वप्ने हूनन सुंदर घरटे मना हून असेल मोटे
दोघानाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनदाची अन तृप्तीची शांत सावली येते मिळेल

जुळले रे नाते अतूट आणि  जन्म जन्माची भेट
 घेउनिया  प्रीतीची आन, एक रूप होतील प्राण
सहवासाचा सुन्गंद  येथे आणि सुन्गद रूप दिसे ...
 -----------------------------------------------------------------------------------------------------------

एक नाम तुम्हारा लेकर हम जीते है मरते है ,
 ये इश्क निभाना देना तुम गुजारिश ये करते है ,
तुम खुश हो तो हम भी यु खुश रहते है
तुम रूटो तो हम खुद से रूटे रहते रहते है ..
ये जान लो बस तुमसे ही हम अपनी खबर रखते है
तुम भूल ना जाना इसको  गुजारिश ये करते है

जितना भी हम तुमको चाहों तो कम लगता है
ये इश्क इसीलिए ही तो पल पल बढ़ता है
तुम से ही इस  जीवन का सारा ही भ्रम रखते है तुम तोड़ ना देना इसे ये गुजारिश करते है

Monday, December 27, 2010

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते

य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते

एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते

आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते

आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??
प्रत्येक पोर्णिमेच्या चंद्रात -
आपण तिलाच् शोधत फिरतो..
प्रत्येक नविन कविता -
तिलाच् अर्पण करतो..
तिला मात्र तरीही काहिच् उमगत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

उशीर झाला असला की-
आपण घाई घाई करतो!
मेटाकूटीने चढून आपण-
बसमध्ये उभे ठाकतो!
मुलीशेजारी बसण्याचं तरीही धाडस होत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

चित्रपट पाहून आल्यावर-
आपण उद्दात्तं विचार करतो!
कोणीतरी मोठं बनण्याच्या -
इर्षेला आपण पेटतो!
इर्षावगॅरे सगळं रात्रीपुरतच् टिकणारं असतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडतं.....

मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय

Monday, December 13, 2010

अपयशाची सोळा कारणे:

अपयशाची सोळा कारणे:
 • कुठलाही व्यवसाय यशस्वी करणासाठी त्यातील शिक्षणाला महत्व आहे व हे शिक्षण शेवट पर्यंत चालू ठेवावे लागते , मला धंद्यातील सर्व मर्म समजले असा ज्याचा विचार असतो तो बनचुका होतो, व सुधारणा न केलाने अपयशी ठरतो.
 • व्यवसाय बंद पडेल अशी व्यर्थ चिंता करणारा अयशस्वी होतो असा चिंतेचे काहीच कारण नसते.
 • संकटच्या वेळी उपयोगी पडावे म्हणून उदोजाकानी नेहमी राखीव शक्ती व भांडवल राखून ठेवावे लागते. यालाच गंगाजळी reserve force म्हणतात. युद्धात हि राखीव फौजाचे महत्त्व आहे तेच व्यवसायात आहे. राखीव फौज संकटाच्या वेळी उपयोगी पडते, राखीव पुंजी  नसल्यामुळे  उदोजक अपयशी ठरतो.
 • काहींच्या मनात स्वत: च्या ताकदीविषयी न्यूनगंड असतो व बळकट इच्छा नसते इच्छाशक्तीच्या अभावामुळे अपयश येते.
 •  निर्णयाश्क्तीचा अभाव हे अपयशाचे कारण आहे.
 • व्यवसाय करताना माणसाने भावना प्रधान होता कामा नये , भावनेच्या आहारी जाऊन अयोग्य मित्राला आर्थिक साह्य दिल्यास ते तो बुडवतो . व हि गोष्ट अपयशाला कारणीभूत होते.
 • तुमचा वेळ घेणाऱ्या , तुमची मदत व्याया घालवणाऱ्या लोकांना नाही म्हणून सांगण्याची कला जो उदोजक जोपासत नाही त्याला अपयश येते.
 • अनेक उदोजाकाना स्वतचे कार्यक्षेत्र निशिच्त ठरवता येत नाही. केवळ जवळ भांडवल आहे म्हणून एकाच वेळी पाच पंधरा क्षेत्रात तो काम सुरु करतो, मग कोठेच यश येत नाही.
 • यश जवळ आल्यावरही  काही जन अपयशी ठरतात,  कारण त्याच वेळी त्यांचा संयम सुटतो, भातशिजे पर्यंत थांबल्या नन्तर तो निवे पर्यंत  थांबेवेच लागते.
 • व्यवसाय संबंधी किंवा माणसासंबंधी तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत, नाही तर पुर्वग्राहाच्या भोवऱ्यात अडकून उदोजक अयशस्वी ठरतो.
 • काही उदोजाकाना थोडेशे यश मिळाल्या बरोबर त्या यशाचा कैफ चढतो, तो अहंकारी होतो व चुका करू लागतो म्हणून यश डोक्यात यश चढू देवू नका .
 • व्यवसायातील जाणकारांच्या सल्ला न घेणारही किरकोळ गोष्टी मुले अपयशी ठरतो. कारण सर्व प्रकारची बुध्दिमत्ता तुमच्या कडे असेलच असे नाही.
 • उदोजकाची व व्यापाराची एक प्रतिमा असते हि प्रतिमा कायम ठेवानासाठी काही वेळेला किरकोळ गोष्टीकडे हि लक्ष  द्यावे लागते  असे लक्ष दिले नाही तर प्रतिमा बिगाडते व त्यातून अपयश येते.
 • हातातील काम अपुरे ठेवूनच  काही उदोजक नवीन उत्पादन/ काम  हातात घेतात , त्यामुळेच सर्व कामे अपुरे राहतात व यश लाभत नाही .
 • चैतन्याचा अभाव व आळशीपणा  हे अपयशाचे मोठे कारण आहे.
 • व्यवसायातील प्रतिमा राखण्यासाठी व पद टिकवण्यासाठी स्वतचा स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. प्रत्येक बाबतीत लोभीपणा केलास यश मिळत नाही .

मराठी विचार ...

 • मन , बोलणे, कार्य यात एकरूपता हवी.
 • हाती घ्याल ते तडीस न्या.
 • रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग  | अंतर बाह्य जग आणि मन .
 • घटका जाती फलेही जाती , तास वाजतो घनांना | आयुष्याचा नाश हो तो काम काही करा ना ||
 • आपली आपण करी स्तुती | स्वदेशी भोगी विपत्ती | संगे वडिलांची कीर्ती | तो एक मूर्ख ||
 • राखावे बहुन्तांची अंतरे | भाग्य येते तदनंतरे || भावनाशी समरस होऊन मने जिंका ||
 • दुसर्यासाठी कष्टाला तोची भला | क्षणिक लहर दूर ठेवा | एकाग्रः चित्त करा ||
 • आळस उदास नागवणा | आळस प्रयत्न बुडवना | आळसे करंटेपणाच्या खुणा | कळो येती ||
 • जोडोनिया धन , उत्तम व्यवहारे | उदास विचारे येच करी ||
 • भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा .
 • यश--अडथळे :- अहंकार , भीती , निश्चित योजना नसणे , दिरंगाई , टाळा टाळ, आर्थिक स्थेर्याची समस्या , दिशाहीनता , गोंधळलेपणा , आज मिळणाऱ्या पैसाच्या लोभाने दूरवरचा विचार करणे टाळणे.
 • सर्व काही आपण एकट्यानेच करण्याचा अटहास  धरणे.
 • क्षमते पेक्षा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारणे, बांदिलीकीचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव, चिकाटीचा अभाव, प्राधान्यकर्म ठरवण्याचा अभाव .
 • यश = इच्छा + बांधिलकी + सचोटी + शहाणपणा + जबाबदारी + कठोर परिश्रम + चारित्र्य + जीवनमूल्ये + श्रद्धा + निष्टा + व्यक्तिमत्व .
 • तयारी = ध्येय + तत्व + नियोजन + चिकाटी + सहनशीलता + स्वाभिमान = आत्मविश्वास .
 • पटकन चूक कबूल करणे, त्या चुकीत गुंतून न राहणे , चुकी पासून शिकणे, पुन्हा ती चूक न करणे , कोणाला दोष न देणे किंवा कारण न सांगणे , आपणच आपले आत्मपरीक्षण करणे.
 • मान्यता दया,  आदर दाखवा, कामामध्ये रस निर्माण करा , दुसऱ्याचे म्हणणे अवधान पूर्वक ऐका, कामाचा "एक आव्हान" म्हणून स्वीकार करून ते जिद्दीने करण्यासाठी इतरांना उदयुक्त करा .
 • लोकांना मदत करा , परंतु त्यांना परावलंबी करू नका , त्यांनी स्वत:ची केल्या पाहिजेत , अशा गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करू नका .
 • सवय = ज्ञान + कौशल्य + इच्छा .
 • जिंकन हि एक घटना आहे , जेता असण हि मनोवृत्ती आहे .