Monday, December 27, 2010

आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??
प्रत्येक पोर्णिमेच्या चंद्रात -
आपण तिलाच् शोधत फिरतो..
प्रत्येक नविन कविता -
तिलाच् अर्पण करतो..
तिला मात्र तरीही काहिच् उमगत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

उशीर झाला असला की-
आपण घाई घाई करतो!
मेटाकूटीने चढून आपण-
बसमध्ये उभे ठाकतो!
मुलीशेजारी बसण्याचं तरीही धाडस होत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

चित्रपट पाहून आल्यावर-
आपण उद्दात्तं विचार करतो!
कोणीतरी मोठं बनण्याच्या -
इर्षेला आपण पेटतो!
इर्षावगॅरे सगळं रात्रीपुरतच् टिकणारं असतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडतं.....

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...