Monday, December 13, 2010

मराठी विचार ...

 • मन , बोलणे, कार्य यात एकरूपता हवी.
 • हाती घ्याल ते तडीस न्या.
 • रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग  | अंतर बाह्य जग आणि मन .
 • घटका जाती फलेही जाती , तास वाजतो घनांना | आयुष्याचा नाश हो तो काम काही करा ना ||
 • आपली आपण करी स्तुती | स्वदेशी भोगी विपत्ती | संगे वडिलांची कीर्ती | तो एक मूर्ख ||
 • राखावे बहुन्तांची अंतरे | भाग्य येते तदनंतरे || भावनाशी समरस होऊन मने जिंका ||
 • दुसर्यासाठी कष्टाला तोची भला | क्षणिक लहर दूर ठेवा | एकाग्रः चित्त करा ||
 • आळस उदास नागवणा | आळस प्रयत्न बुडवना | आळसे करंटेपणाच्या खुणा | कळो येती ||
 • जोडोनिया धन , उत्तम व्यवहारे | उदास विचारे येच करी ||
 • भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा .
 • यश--अडथळे :- अहंकार , भीती , निश्चित योजना नसणे , दिरंगाई , टाळा टाळ, आर्थिक स्थेर्याची समस्या , दिशाहीनता , गोंधळलेपणा , आज मिळणाऱ्या पैसाच्या लोभाने दूरवरचा विचार करणे टाळणे.
 • सर्व काही आपण एकट्यानेच करण्याचा अटहास  धरणे.
 • क्षमते पेक्षा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारणे, बांदिलीकीचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव, चिकाटीचा अभाव, प्राधान्यकर्म ठरवण्याचा अभाव .
 • यश = इच्छा + बांधिलकी + सचोटी + शहाणपणा + जबाबदारी + कठोर परिश्रम + चारित्र्य + जीवनमूल्ये + श्रद्धा + निष्टा + व्यक्तिमत्व .
 • तयारी = ध्येय + तत्व + नियोजन + चिकाटी + सहनशीलता + स्वाभिमान = आत्मविश्वास .
 • पटकन चूक कबूल करणे, त्या चुकीत गुंतून न राहणे , चुकी पासून शिकणे, पुन्हा ती चूक न करणे , कोणाला दोष न देणे किंवा कारण न सांगणे , आपणच आपले आत्मपरीक्षण करणे.
 • मान्यता दया,  आदर दाखवा, कामामध्ये रस निर्माण करा , दुसऱ्याचे म्हणणे अवधान पूर्वक ऐका, कामाचा "एक आव्हान" म्हणून स्वीकार करून ते जिद्दीने करण्यासाठी इतरांना उदयुक्त करा .
 • लोकांना मदत करा , परंतु त्यांना परावलंबी करू नका , त्यांनी स्वत:ची केल्या पाहिजेत , अशा गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करू नका .
 • सवय = ज्ञान + कौशल्य + इच्छा .
 • जिंकन हि एक घटना आहे , जेता असण हि मनोवृत्ती आहे .

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...