Tuesday, September 29, 2009

तुला मी विसरु तरी कसे ?

तुला मी विसरु तरी कसे ?

तुझ्या आठवनींना मिटवु तरी कसे ?

माझ्या ह्रुदयात जे तुझ घर आहे

ते घर मी माझ्याच हाताने पेटवु तरी कसे ?

आजकालचं दुख:ही मला अनमोल आहे

शेवटी ते तु दिलेलं आहे

मग मी या निर्रथक अश्रुमागे

त्याला लपऊ तरी कसे ?

मनाचे ढगही दाटुन आलेत

हे डोळेही अश्रुंचा

मुका पाऊस बरसवु लागलेत

या वेड्या मनाची तगमग

या मनाचे निर्मळ स्वप्न

मी तुला सांगु तरी कसे ?

बघ आता विजा चमकु लागल्यात

सोबत पावसाचाही जोर आहे

सांग काय करु आता ?

या वादळात बोलकी वळचण

मी शोधु तरी कुठे ?

ओठावर आलेले हे शब्द

मागे फ़िरुऊ तरी कसे ?

भर पावसातही कोरड्या या मनाला

तुझ्या विरहाने भिजवु तरी कसे ?

आता या पुढे

तुझी सोबत नसल्यावर

मग हे शब्दांचे रंग

मी उधळु तरी कसे ?

सांग तुला मी विसरु तरी कस

Monday, September 28, 2009

तू दिलेली शपथ

तू दिलेली शपथ
.

तुझ्या त्या असाध्य आजारात
मी पण मरत होतो तुझ्या बरोबरच
कणा कणाने .. क्षणा क्षणाने
तेव्हाच ठरवल होत..
ताजमहाल बांधून दिखवा करण्यापेक्षा
सरळ तुझ्या मागेच चालत जाव
पलीकडच्या आकाशात

पण अगदी शेवटच्या क्षणी
तू दिलेली शपथ ... 'माझ्या साठी जग'
आणि निघून गेलीस .... एकटीच ...
.....

तसा मी अजुन जिवंत आहे ग ...
पण काय होत माहितीये
तुझ्या शिवाय ईथे जगता येत नाही
अन् .. तुझ्या शपथे साठी .. मरताही येत नाही

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?
गार गार वारा सुटेल... आभाळ भरून येइल !
अवघ्या देहाचे या होउन जाईल मोरपीस
पाणी माझ्या डोळा आणिक म्हणेन - "का रडलीस ?"

आठवल्यागत तेव्हा मग ओठी येइल हसू
पाउस भरला तरीही म्हणाशील - 'मोकळ्यावर बसू'
मोकाल्यावरती वारा असतो...वार्‍यावरती आपण
आणिक आपल्या दोघानमधले अलगद मिटते 'मीपण' !

शब्द शब्द वेचत राहू...थोड़े हवेत सोडून देऊ
थोड्या वेळानंतर दोघे स्तब्ध होउन बोलत राहू...
बोलता बोलता विचारशीलही - 'दिवस कसे गेले ?'
"दिवस जागण्यासाठीच असतो....रात्रीपुरत बोलू"

आणिक इतका स्पष्ट बोलण पटणारसुद्धा नाही
म्हणुन म्हटल - बोलशील तू; मी बोलणारसुद्धा नाही !
इतके व्हावे, शब्दांचे त्या पक्षी होउन जावेत
काही तुझ्या साठी काही माझ्या साठी गावेत !

ह्या च्या नंतर तसे बोलणे नसतेच आवश्यकसे
डोळ्यांमधले पाणी टिपुन घ्यावे हातासरसे !
माझ्या ओठी तुझी... तुझ्या ओठी माझी गाणी
आणि बघ...आभाळाच्या डोळ्यालाही पाणी

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु

ओळख....

ओळख....


ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची
ओळख.... जपतात फक्त स्वार्थापुरती

कळत असो व नकळत,

कळत असो व नकळत,
सारे काही घडतच असते;
वेळेच्या आधी अन् नशीबाहून जास्त,
कधीच काही मिळत नसते. ~~~~|| ध्रु ||

असू देत जीवनात कितीही,
अडथळ्यांनी भरलेल्या वादळरूपी वाटा;
प्रयत्ऩ असावे आपले अखंड,
जणू काही सागराच्या लाटा. ~~~~|| १ ||

पडू देत कर्तुत्वावर आपल्या,
कसलीही जळजळीत दुष्ट छाया;
देण्यासाठी दुस-याला आपल्याकडे,
असावी कायम आभाळा एवढी माया. ~~~~|| २ ||

दिसं सरती सूर्य उगवती,
दुनिया गाई आपुले जीवनगाणे;
नक्कीच होऊ आपणही एकदा,
स्वत:च्या स्वप्नातील नक्षत्रांचे देणे....

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे

जिवनातल्या आनंदाचा एकही क्षण नाही मागत तुझ्याकडे
आयुष्यातल्या दु:खाचे पहिल्या पासून शेवटचे पळ मात्र आठवणीने दे
आठवणीने दे........

नमस्कार.....

नमस्कार.....
लक्ष कोठे आहे....मी नमस्कार केला...आपल्याला
आणि आपल लक्षच नाही आमच्याकडे.
कामात अहात का ?
काही खास नाही. सहज आलो होतो ह्या बाजुला.
म्हटले.... भेटून जावे आपल्याला.
आपले हाल हवाल विचारावे.
आपण कामात असाल, माहितच होते आम्हाला.
तरी म्हटल तोंड दाखवुनच पुढे जाऊ.
लई लोकांना अजुन भेटायचे आहे.
आलोच आहे तर चार गोष्टी केल्या असत्यात.
पण जाऊ द्या....आपण कामात दिसता.
परत कधी आलो तर नक्की येइन.
सवड मिळाली की जरुर भेटेन.
आणि पुढच्या खेपेला आपल्या बरोबर चहा पण नक्की घेइन.
येतो आता मी. ओळख राहू द्या ह्या गरीबाची.
माझ्या साठी काही योग्य काम असेल तर जरुर सांगा.
आपण हुकुम करावा...हा बंदा हाजिर आहे.
रामराम.....

मित्रा तू फक्त हात दाखव

मित्रा तू फक्त हात दाखव
मीच तुला हात देईन
मित्रा तू फक्त जीव लाव
तूझ्यासाठी मीच जीव देईन.

मित्रा तू फक्त हाक मार
मी नक्की हजर असेन
मित्रा तू फक्त नेहमी बोल
नाहीतर मी नक्की कोलमडेन.

मी चुकलो तरी एकदाच बघ
मीच स्वःताहुन माफी मागेन
तू चुकलास तरी एकदाच बघ
मीच तुला माफ करेन.

मित्रा तु फक्त गोड हस
सारे श्रम शमतील
मित्रा फक्त एक मिठी मार
सगळी दुःख विसरतील

मित्रा फक्त तुझ्या आधारावर
मी जीवन जगत असेन
मित्रा तू फक्त आठवण ठेव
नाहीतर मी जगणच सोडेन.

मैत्री....

मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी

मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा

मैत्री....
एक रोपटे अबोलीचे प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीतले

मैत्री....
एक सुगन्धी दरवळणारे लिहलेले पत्र
खुशालीसाठी उशीराही का होईना नाही पाठवावे मात्र

मैत्री....
एक नात कसल्याही मोहात न अड्कणारे
निरागसता जपताना खळखळुन हसवणारे


मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही न वाकणारे


मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा लख्ख प्रकाश देणारा 'मोती'आला का हाती?

तो मुळातच वेडा..

तो मुळातच वेडा..
अश्रुदेखील शरीराचा भाग म्हणुन जपणारा
मी मात्र अगदी चंचल..
अश्रुदेखील सांडतांना, खळखळुन हसणारी
तो नुसताच कवी..
आभाळ जरी भरून आल तरी त्यावर कविता करणारा
मी मात्र शब्दवेडी..
एक एक ओळ रचतांना, यमकांच भान जपणारी
तो अगदीच भावुक..
सुर्यालाही - चंद्रालाही एकाच नजरेने बघणारा
मी मात्र वेगळीच..
मला ऊन नको, फक्त सावलीतच फिरणारी
पण त्याची कविता वेगळीच,त्याचा अर्थही वेगळा..
एकेका शब्दात भरलेला असतो
चंद्रचींब मारवा माझी कविता एक्कलकोंडी फक्त मनमोकळ हसणारी
माझ मलाच कळत नाही, का स्वतःतच फसणारी ?

काय झाला गुन्हा ते तरी सांग मला

अबोला तुझा सखे
छळतो ह्या सख्याला
दुरावा हा असा
सलतो माझ्या मनाला

काय झाला गुन्हा
ते तरी सांग मला
माझ्या पासून दूर राहून
चैन पडेल का ग तुला..?

जीवाभावाच्या सख्यावर
असे कुणी रुसते का..?
ओठांवर हसू तुझ्या
माझ्या शिवाय असते का..?

माझे काही चुकले असेल
तर सजा देऊ शकतेस..
रागावून असे सख्यावर
सखे तू राहू शकतेस...?

मला नेहमीच असं वाटतं....

मला नेहमीच असं वाटतं....
माझ्या भोवतालचा अंधार....तूझ्या पायरवाने दूर सारशील....
तूझे सापेक्ष आक्षेप....माझ्यात उतरतील न उतरतील....
पण तूझं आरसपानी मन माझ्या जळावर डचमळत राहील.....
नुकतेच व्यालेले माझे शब्द....तूला भाबडलळा लावतील...
उन्हाचा चटका बसल्यागत तु हात असोशीने मागे घेशील...
पण तूला पुन्हा लगडतील.... माझी प्रकाशवलयं....!!
सारखं हटकू नकोस माझ्या पापण्यांच्या विभ्रमाला...
नाहीतर माझे हासू....उंबराची फूलं बनून तूझ्या स्वप्नी येतील....

माझ्या ओठांच्या (इमानी) कमानी...भुवयांची महिरप...
पापण्यांचे तोरण...विखरून ठेव....तूझ्या तप्त हस्तरेषांवर....
विघटन होणारा अंधार पुन:र्जिवित होण्याच्या आत....
सावल्यांवर लक्ष केंद्रित कर....
अन कवडश्यांवर नाचणारे रज:कण....पापण्यांवर गोळा कर.....
त्यांची सोनेरी आभा (आभास) कल्पोकल्पित कपोलांवर पखरत रहा....
अन हो मोकळा एकदाचा....
प्रकाशाच्या सावलीच्या ऋणातून....
तोपर्यंत मी आलेच.....
माझे झपूर्झा घालणारे....
अश्रू.....निचरून.....!!

तु येणार आहेस

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा
गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा
माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा
जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
सुगरिणीचं पिलु जेव्हा
खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
चंद्रासोबत चांदणीही जेव्हा
अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस
याची मला चाहुल लागते,
भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी
निरव शांतता पानोपानी,
जेव्हा पसरु लागते...

काय जादू असते या मैत्रीत !

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

मी कविता करतो माझ्या साठी

उधळले ते बघ चांदणे, प्रफुल्लीत हा चांदवा
नको होऊ राजसा उदास, तुझा सोडना हा रुसवा.............


मी असाच....
मी कविता करतो माझ्या साठी
मी कविता करतो माझ्या जगण्यासाठी
मी कविता करतो माझ्या आपल्यांसाठी
मी कविता करतो माझ्या स्वप्नांसाठी
मी कविता करतो शिकण्यासाठी
म्हनुनच मी कविता करतो .....!!
तुम्ही वाचण्यासाठी..!!

आयुष्यात पुढे सरकत राहा .......

आयुष्यात पुढे सरकत राहा .......
मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते
मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते
अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात
अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामक राक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा

कविता करणे हा माझा छंद आहे

कविता करणे हा माझा छंद आहे
तीला स्वप्न बघायला आवडतात,
अन मला स्वप्नात ती,

तीला पाऊस फ़ार आवडतो,
अन मला पावसात ती,

तीला हसायला आवडत,
अन मला हसताना ती,

तीला गप्प रहायला आवडत,
अन मला बोलताना ती,

तीला मी कधीच आवडलो नसेल ?
अन मला फ़क्त आवडली ती

माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

आपल्याही जवाल आसवे कुणीतरी .......

प्रत्येक श्वासगानिक तिची आठवां येते
याला प्रेम नाहीतर के म्हानायाचा?

रात्रि स्वप्ना तुझी दिवस तुझेच विचार
प्रिये, कुणी इतका का कुणाला सतावाय्चा?

निरखावे तुला डोळ्यानी आणि ह्रदय जखमी व्हावे
म्हणजे गुन्हा करावा कुणी आणि दुख भोगावे दुसर्याने

आता तुझ्या प्रीतिचा मार्ग माझ्याकडून सुटणार नहीं
भले देवही साद घलो आकाशातून

मृत्यु ही आला कव्तालिन चतिशी प्रेमाने
कारन..........
कधीची इच्छा होती मनात
आपल्याही जवाल आसवे कुणीतरी .......

ते नाव तुझाच आहे

ओठांवर जे अहोरात्र असता माझ्या
ते नाव तुझाच आहे
एवढाच कशाला.......
माझी सकल आणि सायंकाल ही तूच आहेस

लैला-मजनू च्या जगण्याचा होता जो हेतु
त्याच प्रेमाचा एक मधुर सन्देश तू आहेस

जे प्राप्त झाल्यावर कशाचीच इच्छा उरली नाहि
असे इश्वरी वरदान तू आहेस

पण गम्मत बाघ
जिच्यासाठी झालो मी बदनाम सार्या जगात
तिने कधी माझी विचारपूस तरी केलि आहे?

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ ||

नांदू देत सुख, समृद्धि, शांति
माझ्या ह्या पावन भूमी

तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!

की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

हो!मीच फ़सवलय त्याला!

हो!मीच फ़सवलय त्याला!
आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी
फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता ,
फ़क्त शव्ब्दांच्या जाळ्यात् गुंफ़लेल्या,
आणि ओरडुन् सांगावे जगाला ...
हो!मीच फ़सवलय त्याला!

आज थांबवलय मि फ़सवायचे
स्वतःला आनि त्याला हि
मुक्त केलय त्याला प्रेमाच्या खेळातुन्
आणि ओरडुन् सांगितले जगाला ...
हो!मीच ..

उन्मळुन पडलाय् तो मुळापासुन्
विश्वास उडालाय् त्याचा प्रेमावरुन्
आणि ह्रुद्यात् आहेत फ़क्त जखमा!

पण्! मला महित् आहे
जखमा कधि तरि भरतील
प्रेमाचे अन्कुर् कधितरि पुन्हा फ़ुटतिल
दुःखातुन हि तो वर येयील आणि
नव् जग निर्माण् करेल

पण्!
नसत जमल त्याल्या पांडव होवुन
आपल्याच् नात्याशि झगडन्
ना जमल असत जपलेल्या मुल्यान्चा
स्वतःच्या हातानि र्हास् करण्,
कदाचित् नव जग उभाहि केल असत्..
पण् नसत जमल त्याला त्यात वावरण्!

म्हणुन मीच वाटा बदलल्या
उध्वस्त केली ति स्वप्न
आणि आता..
जगत आहे त्या चुरगाळलेल्या पानाना कुरवाळत
आणि त्याच्या वेदना मुकपणे सोसत्..

कारण!मीच फ़सवलय त्याला..फ़क्त् मीच्!