Monday, September 28, 2009

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?
गार गार वारा सुटेल... आभाळ भरून येइल !
अवघ्या देहाचे या होउन जाईल मोरपीस
पाणी माझ्या डोळा आणिक म्हणेन - "का रडलीस ?"

आठवल्यागत तेव्हा मग ओठी येइल हसू
पाउस भरला तरीही म्हणाशील - 'मोकळ्यावर बसू'
मोकाल्यावरती वारा असतो...वार्‍यावरती आपण
आणिक आपल्या दोघानमधले अलगद मिटते 'मीपण' !

शब्द शब्द वेचत राहू...थोड़े हवेत सोडून देऊ
थोड्या वेळानंतर दोघे स्तब्ध होउन बोलत राहू...
बोलता बोलता विचारशीलही - 'दिवस कसे गेले ?'
"दिवस जागण्यासाठीच असतो....रात्रीपुरत बोलू"

आणिक इतका स्पष्ट बोलण पटणारसुद्धा नाही
म्हणुन म्हटल - बोलशील तू; मी बोलणारसुद्धा नाही !
इतके व्हावे, शब्दांचे त्या पक्षी होउन जावेत
काही तुझ्या साठी काही माझ्या साठी गावेत !

ह्या च्या नंतर तसे बोलणे नसतेच आवश्यकसे
डोळ्यांमधले पाणी टिपुन घ्यावे हातासरसे !
माझ्या ओठी तुझी... तुझ्या ओठी माझी गाणी
आणि बघ...आभाळाच्या डोळ्यालाही पाणी

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...