Monday, September 28, 2009

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ ||

नांदू देत सुख, समृद्धि, शांति
माझ्या ह्या पावन भूमी

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...