Saturday, March 6, 2010

निर्धार

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हवं

भारतीयांनो

पुन्हा आज पडला,
रक्तामासाचा सडा.
तेराव्याचे खाऊन वडे,
गळे काढून रडा.

आज दिल्लीत पडले,
उद्या मुंबईत घडेल.
ब्रेकिंग न्युज बघुन,
आमचे मनं रडेल.

वाहणाऱ्या रक्ताला,
पाण्याने साफ करा.
मरणारे तर मरुन गेले,
पाकडयांशी मैत्री करा.

ओसामा साल्या तू...,
गुहांमध्ये कुठे लपतोस?
पत्ता देतोस का तुझा?
सांग साल्या कुठे भेटतोस?

आय.एस.आय.च्या सरदारांनो,
सिमीच्या जिवावर उडा.
असेल तुमच्यात दम तर,
समोर येवून लढा.

रक्ताचा रंग लालच...पण,
हिरवा खुप डोक्यात चाललाय.
इथलेच खाऊन ओकणाऱ्यांनी,
देश सारा विकायला काढलाय.

भारतीयांनो तुम्ही फक्त,
शेजाऱ्यांवर प्रेम करा.
रस्त्यावरुन चालता चालता,
कधी तरी स्फोटात मरा.

काय मागू?

काय मागू?

करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !

सुखासह दुःखांतही

सुखासह दुःखांतही साथ देणारी ती मैत्री असते
प्रकाशासह अधांरातही हात देणारी ती मैत्री असते.

आयुष्याच्या खाचखळग्यात जीव गुदमरतो कधी
त्या जीवाला धीराचा श्वास देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड मन भरकटत जात निराळ्या वळणावर
त्या मनाला मोकळी वाट देणारी ती मैत्री असते.

कधी निराशेच्या खोल दरीत जीव झॊकुन देतो कोणी
त्या खोलीतही उतरून हात देणारी ती मैत्री असते.

कधी अगंणात विरहाचे मेघ दाटुन येतात अचानक
त्या एकांतातही बरसुन बरसात देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड वारा सोसाट्याने वाहु लागतो सभोवताली
त्या वा-यातही निरतंर जळणारी साजंवात ती मैत्री असते.

कधी फ़ेकुन देतात उधाण लाटा कोरड्या किना-यावरती
रणरणत्या उन्हांतही छायेचा भास देणारी ती मैत्री असते.

कधी काळोखी रात्र उलटून जाते चादण्यांच्या प्रतीक्षेत
मग त्या काळ्या रात्री चादं रात होणारी ती मैत्री असते.

कधी स्वतःला बुडवुन येतो कोणी भरलेल्या पेल्यात म्हणे
त्या धडपडत्या पावलांना हात देणारी ती मैत्री असते.

कधी पापण्या ओलावतात हळव्या मनाच्या कोप-यात
त्या ओघळत्या आसवांना आस देणारी ती मैत्री असते

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

खेळ उन पावसाचे ..

खेळ उन पावसाचे ..
जीवनाच्या श्रावणात ..
फुल उमले मैत्रीचे ..
आज माझ्या अंतरात ...
फुल नाजुक-कोमल ..
मन नाहले गंधात ..
आयुष्याचा कण क्षण ...
भिजे स्नेहाच्या रंगात ....

धागा स्नेहाचा मायेचा ..
मैत्र अनोखे गुम्फतो ...
विश्वासाचा कवडसा ..
सारे आयु उजळतो ...

आयुष्य

आयुष्य नक्की काय असतं?

हसऱ्या फुलावरचं दव असतं..

नाचऱ्या मुलाचा नाच असतं..

दुखऱ्या हृदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहीन जहाज असतं,

किनारा शोधत फ़िरायचं असतं,

वादळांनी डगमगून जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असतं?

ते एक तलम रेशमी वस्त्र असतं..

ज्याचं त्यानेच ते विणायचं असतं

पण अती ताणायचं नसतं..


आयुष्य नक्की काय असतं?

सतत गुंतत जाणारं ते एक कोडं असतं

ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं

गुंतून मात्र त्यात पडायचं न

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल