Saturday, March 6, 2010

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...