Sunday, April 12, 2009

खेळ उन पावसाचे ..

खेळ उन पावसाचे ..
जीवनाच्या श्रावणात ..
फुल उमले मैत्रीचे ..
आज माझ्या अंतरात ...||

फुल नाजुक-कोमल ..
मन नाहले गंधात ..
आयुष्याचा कण क्षण ...
भिजे स्नेहाच्या रंगात .... ||


धागा स्नेहाचा मायेचा ..
मैत्र अनोखे गुम्फतो ...
विश्वासाचा कवडसा ..
सारे आयु उजळतो ...||

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...