Sunday, April 12, 2009

मी एकटा

मी एकटा
आजकाल मी एकटाच असतो
सगळ्यात असलो तरी कोनातच नसतो
काही तरी आठवून मधेच हसतो
निळ्या आकाशात उडणार्‍या पतन्गाकडे तासन्-तास पाहत बसतो
कधी वाटता की पतन्गासारखे एकटयानेच उडावे
आणि दोर तुटला की अनंतासोबत जुडावे
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखं तेवढा वजा आहे
एकदा सवय झाली की एकटेपणा पण खाणार नाही
दिला जरी काही नाही एकटेपणाने, पण मला सोडून तरी जाणार नाही

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...