Sunday, April 12, 2009

प्रेम करणं सोपं नसतं...

प्रेम करणं सोपं नसतं...

सर्व करतात, म्हणून करायच नसतं ...
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं ...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं ...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...