Saturday, April 11, 2009

कधीतरी प्रेम कराव

मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
तिची आठवण काढत
रात्र रात्र झुराव ,
कधीतरी तिने मग
माझी वाट पाहावी
मी ही मुद्दामच
उशिरा हजेरी लावावी
रागाने ती मग
माझ्याकडे पाठ करून बसावी
माझी पूर्ण संध्याकाळ
तिची समजूत काढण्यात जावी
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव.....


मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
तिचा हात हातात घेऊन
समुद्राकाठी फिराव
तिने मग माझ नाव
वाळूवर लिहाव
समुद्राच्या लाटानी ते
हळूच पुसून जाव
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव......

मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
आपल अस कुणीतरी
हक्काच असाव
तिच्या खांद्यावर डोक ठेवून
सार जग विसरून जाव
तिच्या बरोबर बोलून
माझ मन हलक व्हाव
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव .......................

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...