Saturday, April 4, 2009

Maitri

मैत्री म्हणजे एक अनोखे बंधन आहे...
मित्रांच्या ह्रदयाचे स्पंदन आहे !

मैत्रीमुळे दुर्गुण पळुन जातात...
मोठमोठे अहंकार गळून जातात !

मैत्रीमुळेच जगण्याला अर्थ आहे ....
मैत्रीशिवाय जगणे व्यर्थ आहे !

मैत्री असते एखाद्या फुलासारखी....
कधीही .. कुठेही .. सुगंध पसरविणारी..!

मैत्री असते एखाद्या लहान मुलासारखी....
गोन्डस.. निरागस.. आनंद देणारी...!

मा़झं सगळं जग मैत्रीत सामावलंय ...
आजवर मी मित्रांचं प्रेम तेव्हढं कमावलंय ..!

मैत्री असते उत्तुंग आकाशाएव्ह्ढी ..
असंख्य सूर्यांच्या प्रकाशाएव्हढी...!

मैत्री मनांतला अंधार घालवते....
असंख्य अडचणींमध्येही आशा पालवते ..!

मैत्री नसलेल्यांचे जीवन रूक्ष आहे....
मैत्री म्हणजे आमच्यासाठी 'सदेह' मोक्ष आहे ..!

आनंद-छंद दायिनि.......... मैत्री..!
स्वच्छंद-धुंद दयिनि.......... मैत्री....!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...