Saturday, April 11, 2009

मैत्रीचा प्रवास.........

मैत्रीचा प्रवास.........

मनुष्य येतो जन्माला , भेटतो रक्ताच्या नात्यांना
ओळख होतांना जगाची, दिसते वाट मैत्रीची

जीवनाच्या वाटेवर..
मित्रांच्या सायकलीवर , 'डबलसीट', सुरु होतो मैत्रीचा प्रवास..

धावतात चिमुरडी पावलं आनंदाने
लपाछपी खेळतांना सापडतात गडी नवे
रुसवा फुगवा,देवघेव,दुखणे खुपणे
शाळा,छंदवर्ग अनेक मित्र-मैत्रिणी जोडे

महाविद्यालय जेव्हा दिसे कोप-यावरी
बेभान वा-यापरी मैत्री तेव्हा मनाला खुणवी
कँटीन,कट्ट्यांवर जरी होई उनाडकी
दोस्तांसवे अभ्यास भावी जीवनाचा पाया रची

ढिली होते पकड दोस्तीची, हाती पदवी पकडतांना
राहतात जुने दोस्त मागे , पोटापाण्यासाठी पळतांना
जुळतात मैत्रीचे बंध नवे , नोकरीत स्थिरावतांना
भेटते मैत्री अनोखी , ऑफिसात ओर्कुटींग करतांना

सावकाश , निवॄत्तीचा नारळ जेव्हा हातात पडतो
मॉर्निंगवॉक मित्रमंडळ तेव्हा साथ करतो
उगवता सूर्य बालपणीच्या मैत्रीची आठवण देतो
मावळतांना तारुण्यातल्या मैत्रीची हुरहुर

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...