Sunday, April 12, 2009

हो येते तुझी आठवण .....

तुझ्यासाठी..
हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............
मुसळधार पाउस पहाताना ,
हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,

हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,
त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,

हो येते तुझी आठवण,
ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,
ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,
अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,

हो येते तुझी आठवण,
संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....
त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,

हो येते तुझी आठवण,
रात्र होताना वाटत घेशील मला कुशीत
अन हलूच स्पर्ष करशील मला

म्हणुन............................
हो येते तुझी आठवण .....

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...