Saturday, April 4, 2009

डोळे तुझे.

डोळे तुझे.......
डोळे तुझे.......
माझ्या खिडकीतल्या आभाळातून
कधी मलाच न्याहाळत असतात
डोळे तुझे..
मला क्षणभरच येत हसायला जरासं
आणि क्षणातच हरवतात पुन्हा
डोळे तुझे..
कधी मेघांआडून, कधी मिचकावून
मला पाहत असतात
डोळे तुझे..
तू असतेस अगदी खऱ्यातलीच
मला अस्तित्व तुझं पटवून देतात
डोळे तुझे..
मी लिहीत असतो कविता तुझ्यावर
आणि उत्सुकतेने बघत असतात
डोळे तुझे..
कधी चुकून मी करीत असतो
चुक एखादी
आणि मला सावरत असतात
डोळे तुझे..
कधी हूरहूर मलाही
स्पर्शाची तुझ्या
आणि मला स्पर्शत असतात
डोळे तुझे..

तुझे डोळे आभाळात, कि आभाळ तुझ्या डोळ्यात..?
नक्की फरक यातला सांगतात मला
डोळे तुझे..
तू असलीस जरी दूर तिथे
तरी माझ्यासोबत असतात नेहमीच डोळे तुझे.......

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...