Saturday, April 4, 2009

आयुष्याच्या वळणावरती....

आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....

चालता चालता वाटेत दु:खाचे गाव लागले
थकलेल्या मनाला ती च्या ओढीने ग्रासले

मनच ते असे थांबुन थोडेच रहाणार
भेटुनही तिच्या शी काय बोलावे असे वाटतच रहाणार

म्हणुन मग मी तिला भेटतच नाही,
बोलायचे असुनही शब्दच उरत नाही.....

वाटले न बोलताही, तिनेच ओळखावे सारे
विसरुन माझ्या आनंदाला, दु:ख जाणावे खरे....

वेडया मनाचा, वेडा विचार मनातच राहिला..
तिच्या आठवणीं मध्ये एक-एक दिवस जात राहिला...

आयुष्याच्या वळणावरती मागे वळुन पहाताना,
होतो आनंदी, तिला आनंदात पहाताना...

सोडुन जाताना तिला आनंदाच्या गावी...
आम्ही मात्र विसावलो दु:खाच्या गावी.....

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...