Sunday, April 12, 2009

किती छान झालं असतं...

किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....
समजुन ही घेतलं असतं आणि समजावलं ही असतं
किती छान झालं असतं.......

घेतली असती सगळी दु:खे, भरला असता आनंद ...
या जीवनात माझ्या, मी ही काहीतरी केलं असतं..
किती छान झालं असतं.......

सांगायच्या आधिच समजुन घेतल्या असत्या सगळ्या भावना..
माझ्याही भावनांना कधी तरी वाट मिळाली असती..
किती छान झालं असतं.......

नसते कधिही येऊ दिले डोळ्यात तिच्या अश्रु..
सतत तिच्या ओठांवर स्मित पहाता आलं असतं....
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...