Saturday, April 4, 2009

पाउस

ती' आणि 'पाउस'..
'ती' आणि 'पाउस'..

पाउस...किती आनंद होतो ना पाउस चालू झालाकी...पण आतशा हाच पाउस, तिची आठवन करुन देतो,
तिचे विचर मनात घोळका करतात, मनात काही प्रश्न उठतात..काही ईच्छा येतात..आणि मग, तिचि आठवण,मनातले प्रश्न आणि मनातली इच्छा यांतून येते हि कविता...'ती' आणि 'पाउस' ....

'ती' आणि 'पाउस'..

मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना...

पहिल्या वहिल्या पावसात,
ती नाच नाच नाचेल
चेहेर्यावरचं हस्य तिच्या,
आणखि खुलुन उठेल..
पाउस सुध्धा वेडा होईल,
तिला ओली करताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

भिजता भिजता हळूच,
ती केसं मोकळे सोडेल..
डोळ्यावरची ओली बट,
हळूच मागे सारेल..
उर्वशीही लाजवेल बिचारी,
तिचं मोहक रुप बघताना,
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

भिजता भिजता कदाचीत,
ती माझी आठवन काढेल..
बरसनार्या त्या पावसालाही,
मग माझाच हेवा वाटेल..
पण,ख्ररच माला आठवेल का ती?
अस काही घडताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

पावसाळा चालू झाला की,
तिचेच विचार मनात येतात..
नकळतच डोळे माझे,
उगाचच पाणावतात..
पण,माझ्या भावना कळतात का तिला?
मी तिच्या आठवनीत भिजताना..

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...