Sunday, April 12, 2009

मन..

मन..

उडाले उडाले
झाले हिरवे पान
सुटले सुर्रकन
झाडाच्या कवेतून

कसली ही भूक
कैसी तहान
झाले वेडेपिसे
विहरले दूरदूर

अडकले काट्यांत
माखले पंकात
कैसा हा सोस
हासे सैरभैर

गायले भुंग्यासवे
बनले मोर
नाचले थुईथुई
इंद्रधनु पाहून

झेपावले अंबरी
गाठले पाताळ
सुगंध वादळी
भिरभिरे वेगात

भिजले निजले
निर्झर कपारीत
काळ थबकला
हासले स्वप्नात

जागले पहाटे
नाहले धुक्यात
सजले लहरले
अनंत प्रवास....

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...