Friday, April 10, 2009

आता आठवणीत राहिलेत, ते फक्त शुष्क उसासे

आता आठवणीत राहिलेत, ते फक्त शुष्क उसासे
बाकी सारे तुझ्यासोबतच, एकनिष्ठपणे वाहुन गेलेले ..
ओले श्वास..
आता वाळवंट म्हणावं, कुणीही
इतकी जळजळीत प्रीत आपली
झाडं सारी वाळून गेलीयेत
कुठे सावली सापडेन म्हणुन अजुन मी शोधतोय काही
तु तर केव्हांच निघून गेलीस, वळवाच्या सरीसारखी
मागे तेवढी ठेउन गेलीस एक तिरकस नजर..
तेव्हां मनात दाटलेली ईच्छा, मी तिथेच पुसुन टाकली
वाळुत हाथ फिरवावा तशी...
आता रस्ते नाहीतच इथे,
सारी मैफिलच बदलून गेलीये
आता फक्त वाळू, आणि प्राण कंठाशी आणणारा वारा
सगळीकडे रक्त ओकणारी शांतता
मी तरीही जपली आहेत तुझी निघून जातांनाची दोन पावलं
तुझ्याही नकळत...
तितकाच आधार सुटत्या जीवाला..

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...